‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपून आता जवळपास इतके दिवस झाले आहेत. पण तरीही या शो मधील स्पर्धकांची चर्चा काही कमी झालेली नाही. ‘बिग बॉस’च्या घरातून नवव्या आठवड्यात अभिनेते पंढरीनाथ कांबळे घराबाहेर गेले. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक विनोदी अभिनेता, हास्यसम्राट म्हणून पंढरीनाथ कांबळेनी प्रेक्षकांची मनं जिंकली. वेगवेगळी पात्रे करणारा हा माणूस स्वतःच एक पात्र आहे, हे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळालं. घराबाहेर पडल्यानंतर पॅडी यांनी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या वागण्याबद्दल काही खुलासे केले आहेत. वर्षा ताईंबद्दलची त्यांची मतं त्यांनी स्पष्ट मांडली. (Varsha Usgaonkar On Pandharinath Kamble)
यावेळी काही मुलाखतींमधून त्यांनी वर्षा उसगांवकर यांच्या वागण्याबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की, “मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री जेव्हा बिग बॉसमध्ये आल्या तेव्हा मला सुरुवातीला ते गोड गोड वाटायचं. किती छान ताई बोलतात. नंतर कळलं की ताई तसंच बोलतात. ताई इतर वेळीही तसंच बोलतात. किचनमध्ये जातानाही तसंच बोलतात. अती गोड बोलणं नको वाटतं. जेवण झाल्यानंतर थोडा गूळ आपण स्वीट डिश म्हणून खाणं आणि दररोज गूळच खातोय, साखरेचेच पदार्थ येतायत. मग कधी कधी ते नाटकी वाटतं. थोडीशी नौटंकी वाटते. अर्थात आता हा माझा दृष्टिकोन आहे. प्रेक्षकांचं मत वेगळं असू शकतं”.
आणखी वाचा – 21 November Horoscope : मेष, सिंह व कुंभ राशीच्या लोकांना गुरुवारी व्यवसायात होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या…
पॅडी कांबळेंच्या वक्तव्यावर आता स्वतः वर्षा उसगांकरांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत त्या असं म्हणाल्या की, “पंढरीने बाहेर आल्यावर एका मुलाखतीत म्हटलं की मी ‘बिग बॉस’च्या घरात अभिनय करते आणि याचं मला आश्चर्यचं वाटलं. पंढरीने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. जर मी अभिनय करत होते तर मग तू काय करत होतास? तू सुद्धा अभिनय करत होतास का? मला तरी नाही वाटत की, मी अभिनय करत होते. उलट अरबाज आणि वैभव मला म्हणायचे की तुम्ही अभिनय करत आहात म्हणून…”
आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे लवकरच लग्न करणार, थाटामाटात झालं केळवण. फोटो व्हायरल
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “तर मी त्यांना म्हणायचे की, बाहेर माझे हितचिंत, चाहते किंवा कोणत्याही सहकलाकाराला जाऊन विचारा की, मी एरव्ही कशी वागते?. ते म्हणायचे की, तुम्ही अगदी अलंकारिक मराठी म्हणता. त्यावर मी त्यांना म्हटलं की, असं काही नाही. मी बाहेर सुद्धा अशाच प्रकारे बोलते. कारण मला या भाषेबद्दल प्रेम आहे. माझं मराठी साहित्यचं वाचन झालं आहे. त्यामुळे ते शब्द येतात”.