सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहमदाबादमध्ये विमान कोसळण्यापूर्वी त्या ३३ सेकंदांमध्ये नक्की काय काय घडलं?, धडकी भरवणारं सत्य समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 13, 2025 | 6:30 pm
in Social
Reading Time: 2 mins read
google-news
ahmedabad plane crash details

विमान कोसळण्यापूर्वी त्या ३३ सेकंदांमध्ये नक्की काय काय घडलं?, धडकी भरवणारं सत्य समोर

अनेकांची स्वप्न, भेटी-गाठी, लेकाला भेटण्याची ओढ, नवऱ्या भेटण्यासाठी निघालेली नववधू, उच्च शिक्षणाची झेप सगळं सगळं काही एका विमानाने गिळून टाकलं. तब्बल २६५ लोकांचं जीवन क्षणात नाहीसं झालं. गुजरातहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतलं. काही कळायच्या आतच हे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळलं. विमानात बसून लाखो स्वप्न पाहणाऱ्यांचे शरीर काही मिनिटांमध्ये आगीच्या लाटांमध्ये होरपळून निघालं. काय काय घडलं असेल त्याक्षणी… फक्त व्हिडीओ, फोटो पाहिले तरी काळजात चर्रर्रर्रर्रर्र होतं. एअर इंडियाचं AI171 विमान उड्डाणानंतर अवघ्या ३३ सेकंदामध्ये खाली कोसळलं. पण या ३३ सेकंदामध्ये नक्की काय काय घडलं? हे सविस्तर पाहूयात. (ahmedabad plane crash details)

सोशल मीडियावर विमान कोसळतानाचे, विमान कोसळल्यानंतर असंख्य व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तेथील परिस्थिती नेमकी काय असू शकते? याचा अंदाज येतो. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये २६५ लोकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद समोर आली आहे. पण विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते ३३ सेकंदांमध्ये कोसळलं. त्यादरम्यान नक्की काय घडलं हे हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.

आणखी वाचा – तीन दिवसांपूर्वीच करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीला स्वतःच्या मृत्यूबाबत माहित होतं?, ‘ती’ पोस्ट व्हायरल

विमानाने उड्डाण घेताच ते पुन्हा खाली येताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र पुन्हा उड्डाण करण्यासाठी विमान वरच्या दिशेने जातानाही दिसलं. मात्र यावेळी प्रयत्नांना यश आलं नाही. काही कळायच्या आतच ते खाली कोसळलं. या विमानाचं रुपांतर एका भयंकर आगीमध्ये झालं. विमान ज्या इमारतीवर कोसळलं ती मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची इमारत होती. दुपारची वेळ असल्यामुळे मेडिकल कॉलेजमधील मुलं हॉस्टेलमध्ये जेवत होते.

आणखी वाचा – Video : करिष्मा कपूरच्या लग्नात करीनाचा नखरा, नवरीसारखा डोक्यावरुन पदर घेतलेला आणि…; लूक पाहून चाहते हैराण

#WATCH | DD News held an exclusive conversation with #Vishwashkumar, the only survivor of the Ahmedabad plane crash.#planecrashahmedabad #AirIndiaFlightCrash |@neerajddnews pic.twitter.com/tGD2VOVFkr

— DD News (@DDNewslive) June 13, 2025

विमान कोसळलं की नक्की काय झालं? हे त्या कॉलेजमधील मुलांनाही कळत नव्हतं. क्षणार्धात शांत उभी असणारी इमारत जीवघेण्या आगीमध्ये रुपांतरीत झाली. काच, भिंतीचे तुकडे वाऱ्यासारखे उडत होते. एविएशन सेफ्टी नेटवर्क डेटाबेसच्या नुसार ड्रिमलायनर कंपनीची ही पहिली विमान क्रॅश झालेली घटना होती. क्षणार्धात नक्की काय होणार आहे? याची पुसटशी कल्पनाही कोणाला नसावी.

विमानाने उड्डाण घेताच नक्की काय काय घडलं?

दुपारी १.३० वाजता – विमान उड्डाण घेण्यासाठी तयार झालं

दुपारी १.३१ वाजता – विमानाने धावपट्टीवर पुढे जाण्यास सुरुवात केली

दुपारी १.३४ वाजता – फ्लाइट टेक ऑफसाठी रनवे २८वर रांगेत उभी होती

दुपारी १.३८.२४ वाजता – ड्रिमलायनरने अखेरची प्री-फ्लाइट तपासणी केली आणि रनवेमधून विमान पुढे सरकलं

दुपारी १.३८.४० वाजता – AI171 विमानाने टेकऑफ केलं. काही क्षणांमध्येच पायलटने ATC ला मेडे कॉल (Mayday) पाठवला. आणीबाणीच्या प्रसंगी या पर्यायाचा वापर केला जातो.

दुपारी १.३८.५५ वाजता – विमान ६२५ फुट उंचावर पोहोचलं होतं. फ्लाइट रडारच्या डेटानुसार माहिती समोर आली की, विमान वेगाने खाली उतरण्यापूर्वी १७४ (knots) समुद्रापासून उंचावर कमाल वेग गाठला.

दुपारी १.३९.१३ वाजता – विमानाचं पुढचं लोक उंचावर जाऊ लागलं आणि हळूहळू जमिनीच्या दिशेने येऊ लागलं. काही क्षणांमध्येच विमान डोळ्यांसमोर होत्याचं नव्हतं झालं.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Karishma Kapoor Husband Death

मित्रांशी संबंध ठेवायला भाग पाडले, घरगुती हिंसाचार केला आणि…; करिष्मा कपूरने पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेले गंभीर आरोप, ताणतणाव वाढत…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.