शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मित्रांशी संबंध ठेवायला भाग पाडले, घरगुती हिंसाचार केला आणि…; करिष्मा कपूरने पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेले गंभीर आरोप, ताणतणाव वाढत…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 14, 2025 | 9:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Karishma Kapoor Husband Death

मित्रांशी संबंध ठेवायला भाग पाडले, घरगुती हिंसाचार केला आणि…; करिष्मा कपूरने पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेले गंभीर आरोप, ताणतणाव वाढत…

Karishma Kapoor Husband Death : वयाच्या ५३ व्या वर्षी यूकेमध्ये पोलो खेळत असताना करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि व्यावसायिक संजय कपूर यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागच्या जागीच मृत्युमुखी पडले. करिश्मा आणि संजय कपूर यांच्या लग्नात सुरुवातीपासूनच खूप ताणतणाव होते. घटस्फोटाच्या कायदेशीर लढाई दरम्यान करिश्माने संजय कपूरवर अनेक गंभीर आरोपदेखील केले. २९ सप्टेंबर २००३ रोजी करिश्मा कपूरने तिच्या घरीच पारंपरिक शीख पद्धतीने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले. तर लग्नाच्या काही वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये संजय आणि करिश्माने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि ते वेगळे झाले.

२०१५ मध्ये त्यांनी आपली संमती मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट हा एक उच्च-प्रोफाइल प्रकरण बनले, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले. या अहवालानुसार करिश्माने दावा केला की, संजयने आरोप करत तिचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलिवूड शहादीसच्या वृत्तानुसार, करिश्माने तिच्या एका याचिकेत तिच्या हनीमूनच्या घटनेचा उल्लेख केला. राजा बाबू अभिनेत्रीने कथित बाजूने सांगितले की, संजय कपूरने तिचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला आणि तिला तिच्या मित्रांबरोबर अश्लील संबंध ठेवायला भाग पाडले.

आणखी वाचा – तीन दिवसांपूर्वीच करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीला स्वतःच्या मृत्यूबाबत माहित होतं?, ‘ती’ पोस्ट व्हायरल

जेव्हा तिने असे करण्यास नकार दिला, तेव्हा संजयने अभिनेत्रीला मारहाण केली आणि एका मित्राकडून तिची किंमतही घेतली. २०१६ मध्ये करिश्मा कपूर यांनी संजय कपूर आणि त्याच्या आईविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला, ज्यामध्ये तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप होता. करिश्मा कपूर यांनी असा दावा केला की जेव्हा ती गर्भवती होती, तेव्हा संजयने तिच्या आईला सांगितले होते की जर ती ड्रेसमध्ये बसत नसेल तर तिला मार.

आणखी वाचा – “विमान कोसळलं आणि…”, अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या ‘त्या’ प्रवासाने सांगितली खरी परिस्थिती, म्हणाला, “मीही मरणार होतो पण…”

करिश्माने संजयविरुद्ध हुंडा छळ केल्याचा खटलाही दाखल केला होता. यामुळे मुंबई पोलिसांनी संजयला समन्स पाठवले. हे सर्व आरोप तेव्हा चर्चेत आले जेव्हा करिश्माने दावा केला की संजय तिला आर्थिक मदत करण्यास तयार नाही, म्हणून तिने तिची संमती मागे घेतली आणि माध्यमांमध्ये अश्लील आरोप करण्यास सुरुवात केली. अखेरीस, २०१६ मध्ये, दीर्घ कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला त्यानंतर संजयने १३ एप्रिल २०१७ रोजी प्रिया सचदेवशी लग्न केले.

Tags: entertainmentKarishma Kapoorsanjay kapoor death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
dipika kakar health

कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्कर रुग्णालयातून घरी परतली, लेकाला घट्ट मिठी मारली आणि…; नवऱ्याचा हात धरुन…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.