dnyanada ramtirthkar health updates : मालिका म्हटलं की कलाकारांची तारेवरची कसरत ही आलीच. ही कलाकार मंडळी जवळपास १० ते १२ तास , ऊन, वारा, पाऊस कसलाही विचार न करता अहोरात्र शूट करतात. यांत एखादा ऍक्शन सीन, लग्न समारंभ, महाएपिसोड असल्यास कलाकारांना अधिकच मेहनत करावी लागते. अनेकदा याचा परिणाम कलाकारांच्या आरोग्यावर होताना पाहायला मिळतो. सध्या पावसाळा सुरु असल्याने सर्दी-तापाची साथ पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मधील जुई गडकरी आणि ‘सावळ्याची जणू सावली’ मधील प्राप्ती रेडकरला ही प्रकृती कारणास्तव मालिकेतून काही दिवस ब्रेक घ्यावा लागला.
यानंतर आता मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेत्री आजारपणामुळे ब्रेक घेताना दिसली आहे. आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थंकरची ही प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ज्ञानदाने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवर एक फोटो शेअर करत माहिती दिली आहे. ज्यामध्ये तिच्या हाताला सलाईन लावण्यात आले आहे. तिच्या या स्टोरीमुळे ज्ञानदाची प्रकृती बिघडल्याचे स्पष्ट होत आहे.

तिने स्टोरी शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलं “मुंबई लोकल’ चं प्रमोशन आहे, ज्ञानदा कुठे आहे? २०० एपिसोडचं सेलिब्रेशन आहे, काव्या कुठे आहे? तुमची अप्पु, काव्या म्हणजेच ज्ञानदा थोडासा आराम करत आहे. गेले काही दिवस वायरल फिवरसह भांडण चालू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांना एंटरटेन करायला मी येत आहे. तुमचं प्रेम, आशीर्वाद माझ्या बरोबर व माझ्या सर्व प्रोजेक्टस् बरोबर ठेवाल याची मला खात्री आहे!”.
आणखी वाचा – “घटस्फोटानंतर दुसऱ्या महिलेबरोबर…”, अनुराग कश्यपच्या एक्स पत्नीचं भाष्य, म्हणाली, “एकमेकांचा तिरस्कार…”
ज्ञानदाचा ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट १ ऑगस्टपासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच ज्ञानदाची तब्येत बिघडल्याने आता तिच्या चाहत्यांमध्येही काळजीच वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या ज्ञानदाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर ते नेहमीच ज्ञानदाशी संपर्कात असतात.





