शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घटस्फोटानंतर दुसऱ्या महिलेबरोबर…”, अनुराग कश्यपच्या एक्स पत्नीचं भाष्य, म्हणाली, “एकमेकांचा तिरस्कार…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 22, 2025 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kalki Koechlin divorce

"घटस्फोटानंतर दुसऱ्या महिलेबरोबर…", अनुराग कश्यपच्या एक्स पत्नीचं भाष्य, म्हणाली, "एकमेकांचा तिरस्कार…"

Kalki Koechlin divorce : अभिनेत्री कल्की कोचलीन हिने २०११ मध्ये उटी येथे दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले. दोघे ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले. त्यांनतर अगदी दोन वर्षातच म्हणजे २०१३ मध्ये त्यांनी विभक्त होण्याची घोषणा केली आणि २०१५ मध्ये त्यांनी अधिकृत घटस्फोटही घेतला. अशातच आता अभिनेत्री दिग्दर्शकाबरोबरच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलली आहे. असे म्हटले जाते की एक्स पतीपासून विभक्त होणे तिच्यासाठी सोप्पे नव्हते, परंतु अडचणींनी भरलेले होते. २०१५ साली कल्की आणि अनुराग यांनी घटस्फोट घेतला असला तरी अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल केलेलं भाष्य लक्षवेधी आहे.

‘झूम’ शी बोलताना कल्की कोचलीन हिने अनुराग कश्यपपासून विभक्त होण्याविषयी सांगितले. असा एक काळ होता जेव्हा तिला असे वाटले की दोघांनीही एकमेकांच्या आयुष्यापासून दूर रहावे. ती पुढे म्हणाली, “त्याला दुसर्‍या कोणा महिलेबरोबर पाहून मला वाईट वाटले. कारण मी खूप काही गमावत आहे असं मला वाटत राहायचं. अभिनेत्रीने आता त्यांचे संबंध कसे आहेत हे देखील यादरम्यान स्पष्ट केले. कल्कीने मुलाखतीत सांगितले की, तिला या नात्यातून बाहेर पडण्यासाठी काही वर्षे लागली. त्यांचा तसा काही संबंध नव्हता. सुरुवातीला त्याने अंतर ठेवले”.

आणखी वाचा – “वडिलच तिला दारू पाजायचे आणि…”, प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या बऱ्याच वर्षांनंतर धक्कादायक सत्य समोर, कर्जामुळे उद्धवस्त अन्…

पुढे ती म्हणाली, “मी १३ वर्षांची असताना माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यावेळी घरातील वातावरण अत्यंत वाईट होतं. ते खरोखरच एकमेकांसाठी वाईट होते. ते एकमेकांचा तिरस्कार करायचे. मी त्या काळात मोठे झाले. तो कठीण काळ होता. कदाचित त्यांच्या घटस्फोटाचा परिणाम माझ्या मनावर इतका झाला की माझाही घटस्फोट त्यामुळे झाला असावा. माझे पालक वेगळे होताना एकमेकांचा तिरस्कार करताना मी पाहिले आहे. अशा घटनांमुळे वाईट परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकत नाही, असे वाटू लागले. स्वतःवरचा विश्वास कमी होतो. पण, मी उपचार घेतले, थेरपी घेतली, त्यामुळे मला त्यावर मात करता आली”.

आणखी वाचा – “वडिलच तिला दारू पाजायचे आणि…”, प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या बऱ्याच वर्षांनंतर धक्कादायक सत्य समोर, कर्जामुळे उद्धवस्त अन्…

ती पुढे म्हणाली, “आता आमच्यात गोष्टी ठीक आहेत आणि आम्ही वेळोवेळी एकमेकांना भेटतो”. कल्की गेल्यावर्षी अनुराग कश्यप आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाज यांच्या मुलीच्या लग्नालाही हजेरी लावली होती. कल्कीच्या आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती इस्त्रायली मायसियान गाय हरशबर्गची पत्नी आहे. दोघांनी लग्नापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये मुलगी सपोला जन्म दिला. दोघेही इस्रायलमधील पेट्रोल पंपवर भेटले. प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांचे नाते आणखी तीव्र झाले. आणि मग त्यांनी बाळाची योजना आखली.

Tags: bollywood actressentertainmentKalki Koechlin divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
dnyanada ramtirthkar health updates

‘लग्नानंतर होईलच…’ फेम ज्ञानदा रामतीर्थकर रुग्णालयात भरती, बेडवरील फोटोही केला शेअर, म्हणाली, “गेले काही दिवस…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.