स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘लग्नाची बेडी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. मालिकेत येणाऱ्या टर्न अँड ट्विस्टमुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतेय. या मालिकेतील सिंधू आणि राघवच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सिंधूमध्ये अल्लडपणा आहे पण सोबतच ती जबाबदार आणि बिनधास्त आहे. प्रत्येक बाबतीतील तिचा खंबीरपणा, तिची कुठलीही परिस्थिती हाताळण्याची पद्धत प्रेक्षकांना भावते. मालिकेतील राघव आणि सिंधू यांचं लग्न याआधी अपघातानेच झालं होतं. मात्र कालांतराने त्यांच्यात हळूहळू मैत्री होत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. (lagnachi bedi artist video)
आता सिंधू आणि राघव यांचं पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्नाचा सीन सुरु आहे. दरम्यान या वेळी मालिकेत एक रंजक वळण आलेलं पाहायला मिळतंय. मालिकेत रायाचं निधन झालेलं दिसतंय. दरम्यान मालिकेत रायाची शोकसभा करण्यात आली आहे. शोकसभेदरम्यानचा एक गंभीर नव्हे तर मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रायाच्या शोकसभेत सिंधू आणि मधू राणी हिचा पिंगा या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मालिकेत सीन गंभीर दाखवत असले तरी कलाकार मंडळी हे त्यांच्या सीनव्यतिरिक्त असलेल्या वेळेत मज्जा मस्ती करत असतात. असाच सिंधू आणि मधू राणी हिचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.(lagnachi bedi artist video)
हे देखील वाचा – सईसाठी बॉयफ्रेंडची खास पोस्ट, एकत्र फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा
आता रायाच्या मृत्यूमुळे मालिकेत आणखी कोणते टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.
