आज अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी मराठी सिनेसृष्टीतील एक काळ चांगलाच गाजवला होता. यामध्ये आजही एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. एक कलाकार म्हणून आपला सर्वांचा लाडका लक्षा लोकप्रिय होता तेवढाच तो माणूस म्हणून ही होता.(Laxmikant berde interview)
सहकलाकारांचे प्रश्न सोडवणे, त्यांना सेटवर परकं वाटू नये म्हणूनत्यांच्यातलाच एक होऊन काम करणं ही लक्षाची खासियत म्हणायला हवी. अनेक नायिकांसोबत काम केल्यानंतर त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल लक्षाने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. चला तर जाणून घेऊया काय म्हणाला आहे लक्षा आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा आकर्षणाबाबत लक्ष्मीकांत काय म्हणाले (Laxmikant berde interview)
या मुलाखतीत लक्षाने नायिकांबद्द्दल वाटणाऱ्या आकर्षणाबाबत भाष्य केलं आहे. जेव्हा लक्षाला सहकलाकारांसोबत कधी अट्रॅक्शन झालं आहे का? किंवा ज्या नायिकेसोबत काम करतोयस त्या नायिकेसोबत कधी प्रेम झालं आहे का?’ असा प्रश्न विचारला असता यावर लक्ष्मीकांत बेर्डे यांने उत्तर देत म्हटले होते की, “मराठीत तर असं कधीच घडत नाही. कारण मराठी चित्रपटातून शारीरिक जवळीक फारशी होत नाही, लांब राहूनच सिन बनवण्यात येतात.” (Laxmikant berde interview)
हे देखील वाचा – निवेदिता यांचा फोटो पाहून चाहत्यांना आली मामांची आठवण
त्यानंतर लक्षाला विचारलं की, ‘एकाच चित्रपटात काम करत असताना कधी कोणत्या अभिनेत्रीकडे आकर्षण झालं आहे का? त्यावेळी तुम्ही मनावर कसा ताबा ठेवता?’ या प्रश्नाचे उत्तर देताना लक्ष्मीकांत म्हणतात की, “आकर्षण तर होतच असतं पण आपल्याला माहितीये की ती आपल्याला मिळणार नाही.”(Laxmikant berde interview)
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एक नायक वा कलाकार म्हणून कायमच अभिनयाचा आणि सहकलाकारांचा आदर केला. म्हणूनच तर या महानायकाची जागा आज प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत. कामाप्रती आणि विशेषतः आपल्या सोबत काम करणाऱ्या नायिकेबद्दल त्याने प्रत्येक बाबतीत खबरदारी घेतली. आज लक्ष्याला जाऊन बरीच वर्षे झाली असली तरी त्याची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही वा त्याला कुणी विसरलेलं नाही.
