टेलिव्हीजनवरील ‘क्योकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका अधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने दीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री स्मृति इराणी, हितेन तेजवानी, अपारा मेहता, अमर उपाध्याय, सुमित सचदेव, रिवा, रोनीत रॉय असे अनेक दिग्गज कलाकार होते. यामध्ये अशी अजून एक अशी अभिनेत्री होती जीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते ही अभिनेत्री म्हणजे रक्षंदा खान. या मालिकेमुळे रक्षंदा घराघरात पोहोचली. त्यानंतरदेखील तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या ज्यामुळे तिची लोकप्रियता वाढली. सध्या ती काय करते त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. (actress rakshanda khan)
रक्षंदाचा जन्म २७ सप्टेंबर १९७४ साली मुंबई येथे झाला. तिने ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून तिने मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘क्योकी…’ या मालिकेमध्ये २००४ साली काम करण्यास सुरुवात केली आणि मालिका संपेपर्यंत ती या मालिकेचा भाग होती. या मालिकांव्यतिरिक्त ‘तेरे बिन जिया जाये ना’, ‘ब्रह्मराक्षस’, ‘नागिन’, ‘दुर्गा’, ‘कहानी हमारे महाभारत की’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
या वर्षी रक्षंदा ‘प्रचंड अशोक’ या मालिकेमध्येदेखील दिसून आली होती. मात्र ही मालिका मार्चमध्येच बंद झाली. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय नसली तरीही तिचे 250k फॉलोअर्स आहेत. तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, २०१४ साली ती अभिनेता सचिन त्यागीबरोबर लग्नबंधनात अडकली. सचिन व रक्षंदाची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगीदेखील आहे.
दरम्यान ‘क्योकी सास…’मालिकेमध्ये रक्षंदा तान्याचया भूमिकेमध्ये दिसून आली होती. आजही लोक तिला याच नावाने अधिक ओळखतात. यावेळी हितेन करणच्या भूमिकेत होता तर गौरी प्रधान नंदिनीच्या अशा मुख्य भूमिकेत होते. याचवेळी तिने केलेल्या अभिनयाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. आतादेखील ती मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.