‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. आजवर कुशलने त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सगळ्यांना खळखळवून हसवणाऱ्या, सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या कुशलने कायमच प्रेक्षकांची मन जिंकली. कुशल अभिनयाशिवाय उत्तम लेखन ही करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याची लिखाणशैली प्रेक्षकांसमोर मांडत असतो. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कुशलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Kushal Badrike Special Post)
नेहमीच तो चाहत्यांसह काही ना काही शेअर करत संपर्कात राहत असतो. कुशलने केलेल्या शेरोशायऱ्या रसिक प्रेक्षकांना विशेष आवडतात. याशिवाय कुशल त्यांच्या कुटुंबासाठी खास पोस्ट शेअर करताना दिसतो. तसेच कुशल त्याच्या कुटुंबियांबरोबरचे खास क्षण नेहमीच पोस्ट करत असतो. त्याच्या पत्नी व लेकाबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो तो नेहमीच शेअर करत असतो. कुशलचा सुनयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यातील बॉण्ड हा खूपच खास आहे. त्यांच्यातील हा खास बॉण्ड अनेकदा ते सोशल मीडियाद्वारे शेअर देखील करत असतात.
अशातच कुशलने सोहळा मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने नुकतीच बायकोसह कोल्हापूरच्या महालक्ष्मीच दर्शन घेतलं आहे. याबाबतची खास पोस्ट त्याने सोशल मीडियावरुन शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दर्शनानंतर मंदिराबाहेरच्या आवारात पत्नीसह काढलेला फोटो शेअर करत कुशलने “लग्नाला इतकी वर्ष झाली पण जोडीने कोल्हापूरच्या अंबाबाईच दर्शन घेता आलं नाही. अखेर आज योग जुळून आला. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते हेच खरं” असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
काही दिवसांपूर्वी कुशलने त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त कुशलने केलेली भावुक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कुशलने सुनयनाबरोबरचे फोटो पोस्ट करत, “संसार म्हंटल की व्यवहार आला आणि व्यवहार म्हंटल की हिशोब. आता हिशोब लावला, ‘तुझ्या-माझ्या’ नात्याचा, बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी. आपल्या पहिल्या घराचं बुकिंग करण्यासाठी आपण तुझी एकमेव पॉलिसी मोडली होती, आता पुन्हा नवीन घर घेता येईल पण ती ‘ती वेळ’ परत करण्याची पॉलिसी अजून कोणत्याच कंपनीकडे नाही” अशी आशयघन पोस्ट शेअर केली होती.