शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सासू नणंद वगैरे…”, वेस्टर्न लूक पाहता चाहतीने केलेल्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांची लक्षवेधी कमेंट, म्हणाल्या, “एकत्र कुटुंबात राहतो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 20, 2024 | 9:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Comment

"सासू नणंद वगैरे…", वेस्टर्न लूक पाहता चाहतीने केलेल्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकरांची लक्षवेधी कमेंट, म्हणाल्या, "एकत्र कुटुंबात राहतो…"

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आपल्या सुंदर सौंदर्यांने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि ते नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. अभिनयाबरोबर ऐश्वर्या या सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. प्रेक्षकांच्या कायमच सोशल मिडियावरून संपर्कात राहणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला. (Aishwarya Narkar Comment)

हटके फोटोशूट करत त्या नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे अनेक रिल्स व्हिडीओ शेअर करत असतात. या वयात हटके रील व्हिडीओ बनवण्याच्या त्यांच्या या ऊर्जेला, त्यांच्या या उत्साहाला अनेकांनी दाद दिलेली पाहायला मिळाली. तर या वयात हे असले उपक्रम का करताय म्हणून बऱ्याच जणांनी त्यांना ट्रोलही केल. मात्र कोणत्याही ट्रोलिंगला न घाबरता न जुमानता त्या त्यांचा आनंद शोधत असतात. प्रत्येक वेळी ट्रोलर्सला सडेतोडपणे उत्तर देत त्या आपली बाजू मांडत असतात. बरेचदा त्या ट्रोलिंगकडे दुर्लक्षही करताना दिसतात.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याने खरेदी केली नवीकोरी महागडी कार, पोस्ट शेअर करत म्हणाला, ” गाडी दारात आली अन्…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

सध्या ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या मालिकेतल्या भूमिकेचे ही सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी निळ्या रंगाचा टीशर्ट व फ्लोरल शॉर्ट पॅन्ट परिधान करत स्वतःचा सेल्फी घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या सौंदर्याच कौतुक केले आहे.

आणखी वाचा – “ती सर्व विसरली अन्…”, आईच्या आठवणीत छाया कदम भावुक, अश्रू पुसत म्हणाल्या, “तिला यातलं काही…”

यापैकी एका चाहतीने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. या चाहतीने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुम्ही एकत्र कुटुंबात राहता सासू नणंद वगैरे, असं तुम्ही एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. खरचं का? तुमच्या सासरचे खूप समजूतदार आहेत आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा आहे वाटतं. आमच्याकडे तर भुवया वर होतील आणि डोळे बंद होतील” असं म्हटलं आहे. चाहतीच्या या कमेंटवर अभिनेत्रीने कमेंट करत असं म्हटलं की, “हो ते खूप समजूतदार आहेत. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. कपड्यांचं काही नाही अहो. आपल्याला आरामदायी वाटणं महत्त्वाचं. या सगळ्यात कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो” असं त्या म्हणाल्या.

Tags: aishwarya narkaraishwarya narkar answers to fanAishwarya Narkar Commententertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
Next Post
Kushal Badrike Special Post

"लग्नाला इतकी वर्ष झाली पण…", बायकोबरोबरचा फोटो शेअर करत कुशल बद्रिकेची पोस्ट, म्हणाला, "वेळ यावी लागते…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.