छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. या कार्यक्रमाने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन् केले. याया कार्यक्रमासह कार्यक्रमामधील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडेसह अंकुर वाढवे आणि अनेक कलाकारांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिकेचं नशीब हे खऱ्या अर्थाने ऊजळलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने कुशलला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मराठी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर कुशल आता हिंदी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कुशल लवकरच सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला असून या नवीन व्हिडीओखाली चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देत त्याचे अभिनंदनही केले आहे.
या व्हिडीओखाली कुशलच्या अनेक चाहत्यांनी त्याचे ‘मॅडनेस मचायेंगे’ या नवीन कार्यक्रमासाठी कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स केल्या आहेत, मात्र त्यापैकी एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशलच्या एका चाहत्याने या व्हिडीओखाली कमेंट करत “तुम्ही या हिंदी शोमध्ये असणार तर मग ‘चला हवा येऊ द्या’चं काय होईल?, त्यात तुम्ही असणार की नाही?” असा प्रश्न विचारला आहे. यावर कुशलनेही “हो मी असणार आहे” असं म्हणत त्या चाहत्याच्या कमेंटला उत्तर दिलं आहे.

दरम्यान, कुशल ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कार्यक्रमात जाणार असल्याचे कळताच तो हवा येऊ द्या मध्ये असणार की नाही? याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता स्वत: कुशलनेच याबद्दल उत्तर देत खुलासा केला आहे. त्यामुळे कुशल आता मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.