Abhijeet Sawant Video : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव कोरले. तर उपविजेतेपदाचा बहुमान हा अभिजीत सावंतला मिळाला. ‘बिग बॉस’च्या घरात असल्यापासून अभिजीत चर्चेत राहिला. अगदी योग्य पद्धतीने ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ हाताळला. टीम बी मधून अभिजीत खेळत असला तरी टीम ए मधील स्पर्धकांसह त्याचं उत्तम जमायचं. अभिजीतचा खेळ पाहून भाऊच्या धक्क्यावरही त्याचं भरभरुन कौतुक झालं. इतकंच नव्हे तर, प्रेक्षकांमध्येही अभिजीतवर कौतुकाचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. विजेतेपदाचा बहुमान हा अभिजीतला मिळाला नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
अभिजीत हा विजेता झाला नसला तरी अनेकांच्या नजरेत त्याचं स्थान उंचावलं. सोशल मीडियावरुन अभिजीतने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये अभिजीतला रितेशने दिलेल्या लयभारी अवॉर्डचा उल्लेख केला आहे. रितेशने अभिजीतला दिलेली लयभारी ट्रॉफीचा एक सुंदर असा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
आणखी वाचा – ६५ व्या वर्षी संजय दत्तने चौथ्यांदा केलं लग्न, मान्यता दत्तच्या सध्या लूकची चर्चा, फोटो व्हायरल
हा व्हिडीओ शेअर करत, “भले ट्रॉफी माझ्या हातात आली नसेल पण ही एक ओळख, एक आठवण म्हणून मला ही ट्रॉफी रितेश भाऊंनी दिली. देताना ते मला म्हणाले की, “‘बिग बॉस’च्या घरात एक प्रतिष्ठा जपणारा हा एक असा व्यक्ती आहे. सुसंस्कृतपणे तू हा खेळ खेळला. लोकांचंच नाही तर माझं पण मन जिंकलं”, असं म्हणत त्यांनी मला हा लय भारी अवॉर्ड दिला. ही एक साधी ट्रॉफी असली तरी त्यांचे शब्द खूप मोलाचे होते. त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. एक माणूस म्हणून घरात माझं अस्तित्व मी चांगलेपणाने टिकवू शकलो याचा मला खूप अभिमान आहे. लोकं किती काही बोलू देत पण घरात खरी परिस्थिती काय होती हे माझं मला माहित आहे”.
आणखी वाचा – Video : देशमुखांच्या मुलांचे संस्कार! रितेश देशमुखच्या भावांनी केलं आईचं औक्षण, व्हिडीओचं होत आहे कौतुक
हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने कॅप्शन देत असं म्हटलं की, “खूप खूप धन्यवाद रितेश भाऊ. तुम्हाला माझा गेम आवडला, मी तुमचं मन जिंकलं. याचा मला खूप आनंद आहे. आणि ही लय भारी ट्रॉफी तुम्ही मला दिली त्यासाठी मनापासून आभार. सर तुमच्याकडून माझ्या खेळाचे कौतुक म्हणून ही ट्रॉफी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो”.