सध्या ‘बिग बॉस’चे १८ पर्व चांगलेच चर्चेत आले आहे. या पर्वामध्ये मनोरंजन तसेच इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करत असून पहिल्या दिवसांपासूनच या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात चर्चा राहिली आहे. तसेच या शोमध्ये पहिल्या आठवड्यात नॉमिनेशनचा टास्कदेखील देण्यात आला असून यावरुन स्पर्धकांमध्ये वाददेखील झालेले पाहायला मिळाले. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात गाढव ठेवण्यावरुनही Peta या संस्थेने कार्यक्रमाला नोटिस पाठवली असून निर्मात्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आशातच आता या कार्यक्रमाबद्दल एक अपडेट समोर आली असून त्याबद्दल सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (aniruddhacharya maharaj on bigg boss 18)
या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी एका मंचावर एका व्यक्तीला पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ही व्यक्ती म्हणजे अनिरुद्धाचार्य महाराज होय. या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर त्यांना टीकेचा सामनादेखील करावा लागला होता. सोशल मीडियावर अनिरुद्धाचार्य यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पण त्यांनी या कार्यक्रमामध्ये येणं अनेकांना रुचलं नाही. नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या होत्या. अशातच आता त्यांनी स्वतः चाहत्यांची माफी मागितली आहे.
याआधी अनिरुद्धाचार्य यांनी स्वतः सांगितले होते की, “बिग बॉस १८ मध्ये सहभागी होण्याची ऑफर आली होती. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली होती. तसेच अशा कार्यक्रमाचा भाग होणं कधीही आवडणार नाही आणि कितीही पैसे दिली तरीही सहभागी होणार नाही असं सांगितले. पण प्रीमियरमध्ये त्यांना बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या शिष्याची व चाहत्यांची माफी मागितली आहे.अनिरुद्धाचार्य यांचा एक व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणत आहेत की, “जर माझ्या ‘बिग बॉस’मध्ये जाण्याने कोणाही सनातनी व्यक्तीचे मन दुखावलं असेल तर हा मुलगा, हा भाऊ, तुमचा दास सर्व सनातनी लोकांची माफी मागत आहे. पण मला कृपया क्षमा करा. कारण माझा उद्देश फक्त सनातन धर्माचा प्रचार करणं हा आहे”.
पुढे ते म्हणाले की, “मी पुन्हा एकदा तुमची माफी मागत आहे. मी सांगितलं होतं की ‘बिग बॉस’मध्ये मी जणार नाही. पण मी तिथे गेलो नाही. मी तिथे फक्त आतमध्ये जाणाऱ्या १८ सदस्यांचा मी भाग नाही. मी तिथे केवळ आशीर्वाद द्यायला गेलो होतो. तसेच एक पाहुणा म्हणून गेलो होतो. तिथे मी सगळ्यांना भगवत गीतेबद्दल सांगितले”. त्यांनी पुढे सांगितले की, “मी तिथे लोकांना खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. तिथे असलेले सगळेच जण राधे-राधे म्हणत होते. पण मी पुन्हा तुम्हा सगळ्यांची माफी मागेन. कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर क्षमा करा”. दरम्यान अनिरुद्धाचार्य महाराजांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.