Kunickaa Sadanand On Kumar Sanu : प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचे अभिनेत्री कुनिका सदानंदबरोबर विवाहबाह्य संबंध होते. कुनिकाने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत याची कबुली दिली होती. आता ती पुन्हा एकदा याबद्दल बोलली असून तिने गायकाच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबद्दल एक गोष्टही सांगितली. कुनिका सदानंदने सांगितले की, कुमार सानू दारू पिऊन हॉटेलच्या खिडकीतून उडी मारणार असतानाच तिने थांबवले. इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नीने हॉकी स्टिकने अभिनेत्रीची गाडीही फोडली. एवढेच नाही तर ती त्यांच्या घराबाहेर येऊन ओरडायची. कुनिका सदानंदने सिद्धार्थ कननशी संवाद साधताना सांगितले की, ९० च्या दशकात ती कुमार सानू यांना भेटली जेव्हा ती इंडस्ट्रीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होती. उटीमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ आले. कुनिका तिथे शूटिंगसाठी गेली होती आणि कुमार सानू सुट्टीवर होते.
कुनिकाने सांगितले की, कुमार सानू आणि त्यांची पत्नी रिटा यांच्या नात्यात तणाव होता. ते बहीण आणि पुतण्याबरोबर उटीला आले होते. हे सर्वजण हॉटेलमध्ये मद्यपान करत असताना कुमार सानू यांनी दारू पिऊन हॉटेलच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. कुनिकाच्या म्हणण्यानुसार, कुमार सानू रडू लागले आणि खिडकीतून उडी मारणार होते. तो डिप्रेशनने त्रस्त होते. मग कसेतरी तिने कुमार सानूला पकडले.
कुनिका सदानंदच्या म्हणण्यानुसार, उटीहून परतल्यानंतर कुमार सानू आपल्या पत्नीपासून वेगळे राहू लागले. त्यादरम्यान ती आणि कुमार सानू जवळ आले. त्यांचे नाते पाच वर्षे टिकले. कुनिका म्हणाली, “आम्ही आमचे नाते सार्वजनिक केले नाही. पण कुमार सानू यांच्यासाठी मी पत्नीसारखी होते आणि ते माझ्या पतीसारखे होते”. पण कुमार सानू यांच्या पत्नीला खूप राग आला कारण गायकाने तिला मुलांसाठी पैसे पाठवणे बंद केले होते. जेव्हा कुमार सानू आपल्या पत्नीला वेळेवर पैसे देऊ शकत नव्हता, तेव्हा ती त्यासाठी कुनिकाला जबाबदार धरायची.
कुनिकाने सांगितले की, ‘कुमार सानू यांच्या पत्नीने हॉकी स्टिकने माझी कार फोडली. ती माझ्या घराबाहेर येऊन ओरडायची. पण मला त्यांच्या वेदना समजल्या. तिला मुलांसाठी पैसे हवे होते. ती तिची चूक नव्हती. कुमार सानू परत नको, असे त्यांच्या पत्नीने सांगितले होते. कुमार सानूने पाच वर्षांच्या अफेअरनंतर कुनिका सदानंदबरोबर ब्रेकअप केले आणि नंतर सलोनीशी लग्न केले. कुमार सानू आणि सलोनी यांना दोन मुली आहेत.