बॉलीवूड सुपरस्टार गोविंदाची भाची आणि प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंह हिची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. २५ एप्रिलला आरतीचा शुभविवाह संपन्न होणार आहे. आरती तिचा प्रियकर दीपक ठाकूरबरोबर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अशातच तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकतेच हळदी समारंभातील खास क्षणांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओवरुन आरती सिंह तिच्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे. (Arti singh and dipak chauhan haladi ceremony)
आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेक आणि वहिनी कश्मिरा शाह यांनी आरतीच्या लग्नाच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी आरतीची बॅचलर पार्टी आयोजित करण्यात आली होती. यानंतर काल अगदी थाटामाटात आरतीचा हळदी समारंभ पार पडला, ज्याचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. आरती सिंहच्या हळदी समारंभाचा समोर आला व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हळद लावतानाचे काही क्षण पाहायला मिळत आहेत. हळद लावताना आरती भावुक झालेली ही पाहायला मिळाली. यामध्ये आरती सिंहबरोबर अनेक टीव्ही सेलिब्रिटी दिसत आहेत. तर कृष्णा अभिषेक पत्नी व मुलांबरोबर बहिणीच्या लग्नात धमाल करताना दिसला.
अलीकडेच आरती सिंहने एका बॅचलर पार्टीत निळ्या रंगाच्या वन शोल्डर ड्रेस परिधान केला होता. या पार्टीत तिचा भाऊ कृष्णा अभिषेक आणि वहिनी कश्मिरा शाह यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पेलवली. आरती सिंहची चुलत बहीण आणि अभिनेत्री रागिणी खन्ना देखील बॅचलर पार्टीमध्ये उपस्थित होते. माही विज, जय भानुशाली यांसारखे कलाकारही या समारंभात सहभागी होते. यानंतर आरतीचा हळदी समारंभातील लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी अभिनेत्रीने हिरव्या व गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर नवऱ्यामुलाने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.
आरती सिंहचा विवाह २५ एप्रिल रोजी मुंबईतील इस्कॉन मंदिरात होणार आहे. आरती सिंह मुंबईतील बिझनेसमन दीपक चौहानसह लग्न करत आहे. या जोडप्याने साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नासाठी सर्व टेलिव्हिजन विश्वातील कलाकार मंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे. आरती सिंहने मामा गोविंदाच्या लग्नात सहभागी होण्याबाबत अपडेट दिले होते. रिपोर्ट्सनुसार, आरती म्हणाली, “मी माझ्या मामाशी बोलले आहे. मी सांगितल्यावर तो खूश झाला. मला आशा आहे की मामा व मामी माझ्या लग्नाला येतील”. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात अनेक दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. अशा परिस्थितीत मामा गोविंदा आपल्या भाचीच्या लग्नाला येणार की नाही हा प्रश्न कायम आहे.