काही कलाकार मंडळींचा सोशल मीडियावरील वावर हा खूप जास्त असलेला नेहमीच पाहायला मिळतो. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या कलाकारांच्या यादीत आवर्जून घेतलं जाणार नाव म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंच आहे. मात्र क्रांती विशेष चर्चेत असते ती म्हणजे तिच्या सोशल मीडियावरील अनेक रील्स व व्हिडीओमुळे. क्रांती तिच्या लेकींचेही अनेक रील्स वा व्हिडीओ शेअर करत असते. आणि तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंतीही मिळालेली पाहायला मिळते. अशातच क्रांतीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Kranti Redkar On Sameer Wankhede)
क्रांतीचे पती हे सरकारी अधिकारी असून ते त्यांच्या बिनधास्त व बेधडधक कामामुळे विशेष चर्चेत असतात. क्रांतीने शेअर केलेला व्हिडीओ हा तिच्या पतीसोबतच्या गमतीशीर संवादाचा आहे. या व्हिडिओमध्ये क्रांती पतीसोबत खोट बोलून माहेरी केवळ मासे खायला मिळावेत म्हणून जाते. क्रांतीची ही बहाणेबाजी आता शिगेला पोहोचली आहे. यावेळी क्रांतीने कपाटाचं हॅन्डल तुटलं असं सांगून माहेरी पळ काढला. मात्र समीर वानखेडे हे क्रांतीच खोट अचूक ओळखतात, या संभाषणाचा हा व्हिडीओ आहे. इतकंच नव्हे तर क्रांतीने या पोस्टखाली दिलेलं कॅप्शन अधिक लक्षवेधी आहे.
क्रांतीने पोस्टखाली कॅप्शन लिहीत म्हटलं आहे की, “समीरची बदली चेन्नई येथे झाली आहे. त्यामुळे तो फक्त शनिवार, रविवार घरी असतो.आणि मी शनिवार, रविवार त्याच्यासोबत असावे अशी त्याची इच्छा असते. त्याला एकत्र बसून गप्पा मारायच्या असतात, एकत्र जेवण करायचं असत, सोबत शांत बसायचं असतं. आणि मी मालवणी असल्याने. मासे खायला माझ्या आईच्या घरी धावत असते. त्यामुळे दरवेळेची ही बहाणेबाजी आता शिगेला पोहोचली आहे. तो मला मिस करतो आणि मलाही त्याची आठवण येते, पण जेव्हा आई जेवण तयार आहे असं म्हणते. (हा एक दैवी कॉल आहे, तुम्हाला तो घ्यावा लागेल) मला खात्री आहे की सर्व विवाहित मुलींसोबत असंच घडत असेल”.
क्रांतीच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट व लाईक्सचा वर्षाव केला आहे.