शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…म्हणून नवऱ्याला कारणं देत माहेरी निघून जाते क्रांती रेडकर, स्वतःच खुलासा करत म्हणाली, “तो मला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 17, 2023 | 11:12 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar On Sameer Wankhede

…म्हणून नवऱ्याला कारणं देत माहेरी निघून जाते क्रांती रेडकर, स्वतःच खुलासा करत म्हणाली, "तो मला…"

काही कलाकार मंडळींचा सोशल मीडियावरील वावर हा खूप जास्त असलेला नेहमीच पाहायला मिळतो. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या कलाकारांच्या यादीत आवर्जून घेतलं जाणार नाव म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंच आहे. मात्र क्रांती विशेष चर्चेत असते ती म्हणजे तिच्या सोशल मीडियावरील अनेक रील्स व व्हिडीओमुळे. क्रांती तिच्या लेकींचेही अनेक रील्स वा व्हिडीओ शेअर करत असते. आणि तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंतीही मिळालेली पाहायला मिळते. अशातच क्रांतीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.(Kranti Redkar On Sameer Wankhede)

क्रांतीचे पती हे सरकारी अधिकारी असून ते त्यांच्या बिनधास्त व बेधडधक कामामुळे विशेष चर्चेत असतात. क्रांतीने शेअर केलेला व्हिडीओ हा तिच्या पतीसोबतच्या गमतीशीर संवादाचा आहे. या व्हिडिओमध्ये क्रांती पतीसोबत खोट बोलून माहेरी केवळ मासे खायला मिळावेत म्हणून जाते. क्रांतीची ही बहाणेबाजी आता शिगेला पोहोचली आहे. यावेळी क्रांतीने कपाटाचं हॅन्डल तुटलं असं सांगून माहेरी पळ काढला. मात्र समीर वानखेडे हे क्रांतीच खोट अचूक ओळखतात, या संभाषणाचा हा व्हिडीओ आहे. इतकंच नव्हे तर क्रांतीने या पोस्टखाली दिलेलं कॅप्शन अधिक लक्षवेधी आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

हे देखील वाचा – “तो दिवस, ती रात्र माझ्यासाठी…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर घडलेल्या प्रसंगाबाबत बोलल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, “आर्थिक, मानसिक…”

क्रांतीने पोस्टखाली कॅप्शन लिहीत म्हटलं आहे की, “समीरची बदली चेन्नई येथे झाली आहे. त्यामुळे तो फक्त शनिवार, रविवार घरी असतो.आणि मी शनिवार, रविवार त्याच्यासोबत असावे अशी त्याची इच्छा असते. त्याला एकत्र बसून गप्पा मारायच्या असतात, एकत्र जेवण करायचं असत, सोबत शांत बसायचं असतं. आणि मी मालवणी असल्याने. मासे खायला माझ्या आईच्या घरी धावत असते. त्यामुळे दरवेळेची ही बहाणेबाजी आता शिगेला पोहोचली आहे. तो मला मिस करतो आणि मलाही त्याची आठवण येते, पण जेव्हा आई जेवण तयार आहे असं म्हणते. (हा एक दैवी कॉल आहे, तुम्हाला तो घ्यावा लागेल) मला खात्री आहे की सर्व विवाहित मुलींसोबत असंच घडत असेल”.

हे देखील वाचा – ‘ताली’ वेबसीरिजमध्ये तृतीयपंथीयांच्या वेशात सुव्रत जोशीला पाहिल्यानंतर बायकोची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुझ्याबरोबर राहूनसुद्धा…”

क्रांतीच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट व लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tags: entertainmentkranti redkarSameer Wankhede
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Bigg boss marathi fem sai lokur pregnant

‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर गरोदर, नवऱ्याला लिप किस करत दिली आनंदाची बातमी, अभिनेत्रीचा बदलला लूक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.