मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर गरोदर, नवऱ्याला लिप किस करत दिली आनंदाची बातमी, अभिनेत्रीचा बदलला लूक

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2023 | 11:36 am
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
Bigg boss marathi fem sai lokur pregnant

‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर गरोदर, नवऱ्याला लिप किस करत दिली आनंदाची बातमी, अभिनेत्रीचा बदलला लूक

Sai Lokur Pregnant : ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चिक शोमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमध्ये सईचे विविध पैलु पाहायला मिळाले. तिने या शोदरम्यान प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलं. तसेच स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. अभिनेता पुष्कर जोगबरोबर सईची असलेली निखळ मैत्री तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मात्र या शोनंतर ती तिच्या संसारामध्ये रमली. ‘बिग बॉस मराठी’नंतर सईने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आता पुन्हा एकदा तिने एक खास पोस्ट शेअर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे.

२०२१च्या नोव्हेंबरमध्ये सईने तीर्थदीप रॉयबरोबर थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. आता सई व तीर्थदीप आई-बाबा होणार आहेत. सईने खास फोटोशूट करत गरोदर असल्याचं सांगितलं आहे. सईने फोटो व व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवाय गरोदरपणात तिने केलेलं फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – “तो दिवस, ती रात्र माझ्यासाठी…”, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर घडलेल्या प्रसंगाबाबत बोलल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, “आर्थिक, मानसिक…”

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

“आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आमचं कुटुंब आता पूर्ण होणार आहे” असं सईने फोटो शेअर करत म्हटलं आहे. सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रेग्नंसी टेस्ट स्ट्रीप दाखवताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये सई व तीर्थदीपचं लिप किस पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे.

आणखी वाचा – ‘ताली’ वेबसीरिजमध्ये तृतीयपंथीयांच्या वेशात सुव्रत जोशीला पाहिल्यानंतर बायकोची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुझ्याबरोबर राहूनसुद्धा…”

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सईने याआधीही विविध फोटो व रिल सोशल मीडियाद्वारे शेअर केले. यामध्ये तिचा लूक पाहता तिच्या वाढत्या वजनाबाबत अनेकांनी कमेंटही केल्या होत्या. आता गरोदरपणाची बातमी देताच तिचं वजन कशामुळे वाढलं होतं हे समोर आलं आहे. तर काहींनी म्हणून तुझं वजन वाढलं हे आता आमच्या लक्षात आलं अशाप्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.

Tags: bollywood newsentertainment newsmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Smriti Irani On Ask Me Anything

स्मृती इराणींनी मैत्रिणीच्याच पतीशी केलं लग्न?, बऱ्याच वर्षांनी सांगितलं सत्य, म्हणाल्या, “माझा अपमान…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.