शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Kolkata Rape Case : “सगळं भान तिने जपायचं आणि तुम्ही…”, वाढत्या बलात्कार प्रकरणांवर कलाकार संतत्प म्हणाले, “हातात मेणबत्या पकडून…”  

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 17, 2024 | 7:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kolkata Rape Case, Rasika Vengurlekar, Saurabh Gokhale and Shreyas Talpade shared an angry post and said give death penalty

Kolkata Rape Case प्रकरणावर मराठी कलाकारांचा संताप, फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Kolkata Rape Case : पश्चिम बंगालमध्ये ०९ ऑगस्ट रोजी एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाची मागणी होत आहे. कोलकात्यातही निदर्शने होत आहेत. या घटनेत आरोपींना काठोरातली कठोर शिक्षा व्हावी याची मागणी केली जात आहे. या घटनेबद्दल सामान्य नागरीकांसह कलाकार मंडळींनी आपला रोष व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांकडून सोशल मीडियावर या घटनेबाबत आवाज उठवला आहे. सिद्धार्थ चांदेकर, हेमांगी कवी, सई ताम्हणकर, समीर विद्वांस, जिनिलीया देशमुख, नेहा शितोळे, अनघा अतुल, अमित रेखी, हेमंत ढोमे, मंजिरी ओक व रोहित परशुराम यांसारख्या अनेकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Marathi Artists on Kolkata Rape Case)

अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरने या घटनेवर एक खास पोस्ट शेअर करत तिचं म्हणणं मांडलं आहे. रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “सगळं भान तिने जपायचं, मुलगी म्हणून स्वतःला सावरायचं, नीट बसायचं, मोठ्याने नाही हसायचं, चार-चौघात कमी बोलायचं. लोक नाय हे सतत ध्यानात ठेवायचं थोडक्यात स्वतःसाठी नाहीच जगायच. सुंदर, सुडौल दिसायचं, जमत असेल, झेपत नसेल तरी Diet, Exercise अंगी बाळगायच नाहीतर लग्नाच्या मार्केटमध्ये कुणी पसंत करायच ?? थोडक्यात मुलगी म्हणून “स्वतःला Prove करायचं”.

View this post on Instagram

A post shared by Rasika (@rasikavengurlekarofficial)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “वैभव गद्दार, बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात…”, रितेश देशमुखने वैभवची घेतली शाळा, म्हणाला, “तशी जिगर लागते जेव्हा…”

यापुढे त्यांनी “शिकायचं, खेळायचं, नाचायचं, गायचं सर्वगुण संपन्न व्हायच. स्वयंपाकात पारंगत व्हायचं. मॅरेज मटेरियल व्हायचं संस्कारी, संसारी व्हायचं Harmonal Imbalanceला कुरवाळायचं, Savings Investmentsचं Knowledge ठेवत हातात wine glass घेवून Updated पण राहायचं आणि “अरे मुलगी Drive करत असणार” असं म्हणून तुम्ही तिला Degrade करायचं. Doctor, Actor, Inspector सगळीकडे तिने बरोबरीने उभं रहायचं, सरते शेवटी घरी येऊन तिनेच राबायचं, सुंदर-सुडौल म्हणत दिसण्याच भान तिने जपायचं नाही तर छछोर, बाहेरख्याली विशेषण तिच्या नावामागे लागायचं. एखादी छान हसून, मोकळ ढाकळ बोलली की, त्याला तुम्ही आमंत्रण समजायचं. कस हसायचं, कस बोलायचं, कस वागायचं यावर तुम्ही बंधन लावायचं, सर्वगुणसंपन्न, प्रत्येक गोष्टीत तुम्ही तिला Judge करायचं, Mariage Materialचं बिरुद तुम्ही तिच्यावर थोपायचं आणि वाटेल तसं ओरबाडून तुम्ही, शेवटी तिलाच लांछन लावायचं”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव घाबरले आणि…”, सूरज चव्हाणचं मराठी कलाकारांकडून भरभरुन कौतुक, म्हणाले, “तुझ्या हिंमतीपुढे…”

रसिकाबरोबर सौरभ गोखलेनेही याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “बलात्कार करण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगारास सर्वांसमक्ष भर चौकात फाशी दिल्यास अथवा त्याचा चौरंग केल्यावरच हे प्रकार थांबू शकतील”. तसंच श्रेयस तळपदेनेही यावर संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टद्वारे असं म्हटलं आहे की, “पता नहीं कौन मोमबत्तियां पकड़ना सिखा गए हमें, वरना नारी के सम्मान में तो लंका दहन और महाभारत करने की संस्कृति थी हमारी”. दरम्यान, कोलकाता बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून न्यायाची मागणी होत आहे 

Tags: Kolkata Woman Doctor Rape CaseRasika Vengurlekarsaurabh gokhaleshreyas talpade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
neeraj grover murder case

मित्राची हत्या केली, मृतदेहासमोरच बॉयफ्रेंडसह सेक्स, त्यानंतर ३०० तुकडे केले अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची विकृती, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.