Mahesh Manjrekar On Ankita Walavalkar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या पर्वात कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी पहिल्या दिवसापासून ही कोकणकन्या चर्चेत राहिली. अगदी टॉप ५ मध्ये आलेल्या या अंकिताला मात्र पाचव्या क्रमांकावर हा खेळ सोडावा लागला. असं असलं तरी अंकिताने अनेकांच्या मनावर राज्य करत विजय मिळवला. कोकणी भाषेवर प्रभुत्त्व असलेली अंकिता तिच्या रील व्हिडीओमुळे पसंतीस पडते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल भाष्य केलं. मात्र हा तिचा होणारा नवरा कोण आहे याबाबत गुपित ठेवलं. त्यानंतर अखेर अंकिताने दसऱ्याचे औचित्य साधत प्रेमाची जाहीर कबुली दिलेली पाहायला मिळाली.
मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगत हा अंकिताचा होणारा नवरा आहे. लवकरच अंकिता व कुणाल लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘बिग बॉस’मध्ये अंकिताचे अनेकदा स्पर्धकांशी खटके उडाले. तिच्याच टीममधील स्पर्धकांशीही तिचं वाजलं. अभिजीतच्या वागणुकीवर तर तिने स्पष्टपणे त्याला जाब विचारला. दरम्यान, ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यावर अभिजीतने अंकिताशी मैत्री ठेवणार नाही पण ओळख असेल असं सांगितलं. त्यामुळे अंकिताला ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याकडून काही मोठी चूक झाली नाही ना ही भीती सतावताना दिसली. मात्र तिच्या चाहत्यांनी आणि जवळच्या व्यक्तींनी ती अचूक असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यच्या नव्या नात्याची सुरुवात, खास भेटवस्तूही दिली अन्…; मालिकेत नवा ट्विस्ट
अंकिता अचूक होती हे तिला आता थेट महेश मांजरेकरांनी सांगितलं आहे. नुकतीच अंकिताने तिच्या नवऱ्यासह एका कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी अंकिता महेश मांजरेकर यांना भेटली. मराठी ‘बिग बॉस’चे आधीचे चार पर्व होस्ट केलेल्या महेश मांजरेकर यांची भेट घेतली. अंकिता व कुणालने जोडीने मिळून यावेळी महेश मांजरेकरांचे आशीर्वाद घेतले. याचा खास व्हिडीओ अंकिताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी वाचा – सलमान खानने खरेदी केली कोटींची नवीन बुलेट प्रूफ व हायटेक कार, लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
अंकिता व महेश मांजरेकर यांच्यात यावेळी ‘बिग बॉस’च्या गप्पा रंगल्याची शक्यता आहे. कारण अंकिताने या व्हिडीओला “अखेर मला माझं उत्तर मिळालं, मी बरोबर होते” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.