अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगची धमकी मिळाल्याने त्याच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सलमान खानचे जवळचे मित्र आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सलमानला पुन्हा एकदा धमकी आली असताना ही तो शुटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान शुटिंगला जाणार नसल्याचं आधी म्हटलं जात होतं. पण सलमान खानने बाहेर पडून शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. (salman khan security)
एका मोठ्या सुरक्षा पथकासह सलमान खान गुरुवारी रात्री उशिरा स्टुडिओत पोहोचला. यावेळी ६० हून अधिक सुरक्षा कर्मचारी चोवीस तास परिसराचे रक्षण करत असल्याने अभिनेता सेटवर त्याच्या नियुक्त केलेल्या सुरक्षेत आहे. याशिवाय सलमान खानच्या वैयक्तिक अंगरक्षकांबरोबरच प्रोडक्शन टीमने सलमानला सुरक्षित सोडेपर्यंत स्टुडीओमधून बाहेर पडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यंत कडक सुरक्षा व्यतिरिक्त, प्रोडक्शन क्रू मेंबर्स आणि सेटवरील सर्वांना कठोर स्क्रीनिंग प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. कडक सुरक्षा व्यतिरिक्त, क्रू मेंबर्स आणि सेटवरील पाहुण्यांना कठोर स्क्रीनिंग प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.
आणखी वाचा – “लग्नाची सगळी तयारी झालीय पण…”, प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…
याशिवाय सेटवरेल सर्व क्रू मेंबर्सनी त्यांचे आधार कार्ड सुरक्षेसाठी जमा केले आहेत, ज्यांची काळजीपूर्वक चौकशी केली गेली आहे. शिवाय, सेटमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना मेटल डिटेक्टरने तपासले जात आहे. सलमान खानच्या चित्रीकरणाच्या शेड्यूलमध्ये शनिवार व रविवारी प्रसारित होणाऱ्या वीकेंड का वारचा एक भाग आहे. सलमान खानने त्याच्या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण करण्यासाठी मनाचीही तयारी केली आहे. शो आणि त्याच्या प्रेक्षकांशी बांधिलकी दाखवून धैर्याने तो आपल्या कामावर परतला आहे. यामुळे शूटिंग कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुढे जावे यासाठी त्याची सुरक्षा टीम अथक परिश्रम करत आहे.
आणखी वाचा – Like Aani Subscribe Review : ‘लाईक आणि सबस्क्राराईब’मध्ये गुंतलेली मर्डर मिस्ट्री
दरम्यान, १८ ऑक्टोबरला सकाळी सलमानला धमकीचा मेसेज आला होता. लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवण्यासाठी सलमानकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. १९९८ पासून जेव्हा काळवीट शिकार प्रकरणात सलमानचे नाव समोर आले तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे लागला आहे. नंतर पोलिसांनी त्याला Y+ सुरक्षा दिली होती. यासोबतच शेराची खासगी सुरक्षाही आहे, जी सलमानची सुरक्षा करत आहे.