Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, आदित्य पारुसाठी खास भेटवस्तू घेऊन येतो. आता ती भेटवस्तू पारुला कशी द्यायची आणि पारू ती घेईल की नाही याची आदित्यला भीती असते. आदित्य पारूच्या घराच्या दिशेने जात असतो इतक्यात त्याला गणी दिसतो. गणीला मित्र समजून आदित्य पारुसाठी आणलेली खास भेटवस्तू त्याच्या हातात देतो आणि सांगतो की, ‘हे गिफ्ट नेऊन पारुला दे’. या बदल्यात गणी आदित्यकडून भेटवस्तू सुद्धा मागतो. त्यावर आदित्य आजच मी तुला तुझी भेटवस्तू आणून देईन, असं त्याला वचन देतो. त्यानंतर गणी घरी जायला निघतो इतक्यातच त्याला दामिनी दिसते.
दामिनी गणीच्या हातातील भेटवस्तू पाहून विचारते, ही भेट वस्तू तुला कोणी दिली आहे. यावर गणी युक्ती लढवतो आणि सांगतो की, ‘ही भेटवस्तू मला अहिल्यादेवींनी दिली आहे. अहिल्यादेवी आत मध्ये गिफ्ट वाटत आहेत’. हे ऐकल्यावर दामिनी खूप खुश होते आणि सांगते की, ‘आता मी जाऊन वाहिनींकडून मोठा असा सोन्याचा हारच घेते’. त्यानंतर दामिनी घरात जाते तर इकडे गणी पारूच्या हातात ती भेटवस्तू देतो. पारू पाहते तर त्या बॉक्समध्ये पैंजण असते. दामिनी अहिल्यादेवींच्या रूममध्ये जाते तेव्हा दामिनीला कोणतीच भेटवस्तू तिथे दिसत नाही. ते पाहून दामिनी स्वतः सोन्याच्या हाराबद्दल अहिल्यादेवींना विचारते.
आणखी वाचा – “लग्नाची सगळी तयारी झालीय पण…”, प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…
तेव्हा अहिल्या देवी सांगतात की, ‘सोन्याच्या हारा वरुन मला आठवलं, या बांगड्या कशा आहेत?’. यावर दामिनी त्या बांगड्या हातात घेते आणि सांगते की, ‘खूप सुंदर आहेत’. यावर अहिल्यादेवी म्हणतात, ‘हो तुझी चॉईस चांगलीच आहे याबद्दल मला काही शंका नाही. या बांगड्या मी प्रियासाठी घेतल्या आहेत. तुला आवडल्या ना म्हणजे त्या प्रियालाही आवडतील’. हे ऐकल्यावर दामिनीचा हिरमोड होतो. त्यानंतर इकडे पारू प्रीतम व प्रियाच्या अंगठी शोधायच्या खेळाचीही तयारी करत असते. इतक्यात आदित्य तिथे येतो आणि म्हणतो की, हे काय आहे’. यावर पारू त्याला तो खेळ समजावून सांगते. त्यानंतर सावित्री सांगते की, ‘हा खेळ तुम्ही खेळून बघा म्हणजे कळेल. तुम्हाला कोण जिंकणार’. यावरुन पारू व आदित्यमध्ये लढाई होत असते. इतक्यात सावित्रीने दिलेली ही कल्पना त्यांना आवडते आणि ते दोघेही खेळू लागतात.
आणखी वाचा – ऐश्वर्या रायच्या बॉडीगार्डचा एका महिन्याचा पगार किती?, वर्षभराची कमाई तब्बल…
तर ही अंगठी अर्थातच पारू जिंकते. तेव्हा आदित्यला फार राग येतो. त्यानंतर पारू अंगठी शोधायचं भांड घेऊन बाहेर जाते. तर बाहेर प्रीतम व प्रिया बसलेले असतात. आता प्रीतम व प्रिया मधून ही अंगठी कोण शोधणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. इतकंच नव्हे तर पारू आदित्यने दिलेली पैंजण त्याला पुन्हा परत करते आणि सांगते की, ‘ही पैंजण नुसती द्यायची नसते तर ती पायात घालायची असते’. आता आदित्य पारूच्या पायात ही पैंजण कशी घालणार हे पाहणं देखील रंजक ठरेल.