Ankita Walavalkar And Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपलं असलं तरी या पर्वातील स्पर्धक आजही एकमेकांच्या संपर्कात आहेत. ‘बिग बॉस’मधील असे अनेक स्पर्धक आहेत ज्यांचं बाहेरही स्पेशल बॉण्ड असलेलं पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वातील अनेक जोड्या चर्चेत राहिल्या. यापैकी ‘बिग बॉस’च्या घरात तयार झालेलं ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि डीपी म्हणजेच धनंजय पोवार यांचं भावा-बहिणीचं सुंदर नातं विशेष होतं. तर घराबाहेरही अंकिता व डीपी बरेचदा एकत्र दिसले. अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह म्हणजेच कुणाल भगतसह कोल्हापूर गाठत डीपीच्या घरी जात डीपीला आणि त्याच्या कुटुंबियांना भेट दिली.
बिग बॉस’च्या घरात डीपी अंकिताची लहान बहिणीप्रमाणे काळजी घेताना दिसला. आता लवकरच अंकिता कुणालसह लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता वालावलकरची लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. सध्या ती कामातून वेळात वेळ काढत लग्नाची शॉपिंग करताना दिसत आहे. शॉपिंगसाठीचे अनेक व्हिडीओ तिने वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे पोस्टही केले आहेत. अशातच आता कोकणहार्टेड गर्ल थेट डीपीसह शॉपिंगला गेली असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – Video : लग्न मंडपात एन्ट्री करताना मराठी अभिनेत्रीला रडू आवरेना, नवऱ्याला बघितलं अन्…; भावुक व्हिडीओ व्हायरल
डीपीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फनी रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. “कपडे खरेदी करायला ११ वाजल्यापासून रात्री ११ वाजले तरी आम्हाला सोडत नव्हती”, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता कपड्यांच्या दुकानात शॉपिंग करताना दिसत आहे. आणि धनंजय वैतागून खाली बसलेला दिसत आहे. अंकिताची शॉपिंग व्हायला वेळ लागत असल्याने डीपी वैतागून त्या दुकानातच खाली बसलेला दिसत आहे.
अंकिता व डीपीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. “दादा बहिणीचं लग्न आहे एवढं तरी चालतं. बहिणीच्या लग्नात भावानेच कराव लागत हे सगळं keep it up अंकिता ताई”, अशी कमेंट करत चाहत्याने अंकिताला पाठिंबा दर्शविला आहे. तर अनेकांना हा व्हिडीओ पाहून हसू अनावर झालं आहे.