रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनचा जबरदस्त टीजर प्रदर्शित, प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक, कधी प्रदर्शित होणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 3, 2025 | 3:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paatal Lok 2Teaser Out

'पाताल लोक'च्या दुसऱ्या सीझनचा जबरदस्त टीजर प्रदर्शित, प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक, कधी प्रदर्शित होणार?

Paatal Lok 2Teaser Out : २०२५च्या वर्षाची चांगली सुरुवात झाली आहे. प्राइम व्हिडीओने ‘पाताल लोक’च्या मोस्ट अवेटेड दुसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित केला आहे. या सीझनबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि प्रत्येकजण पुन्हा एकदा इन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन सुपर डुपर हिट होता आणि आता सीझन २ ही हिट होण्याची शक्यता आहे. इन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या भूमिकेतील जयदीप अहलावत एका नवीन प्रकरणाच्या तपासात व्यस्त असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेळी सीझन २ मध्ये, दावे जास्त आहेत, रहस्ये खोल आहेत आणि सत्य उघड करण्यासाठीचे प्रयत्नही पाहायला मिळत आहेत.

टीझरच्या सुरुवातीला जयदीप अहलावत लिफ्टमध्ये दिसत आहे. यानंतर तो म्हणतो की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात एक माणूस राहत होता. त्याला कीटकांचा प्रचंड तिरस्कार आहे, हे किडे सर्व वाईटाचे मूळ आहेत. मग एके दिवशी त्या माणसाच्या घराच्या कोपऱ्यातून एक किडा बाहेर आला आणि त्याने त्या माणसाला चावा घेतला”.

आणखी वाचा – अर्जुन कपूरच्या नव्या चित्रपटाची घोषणा, प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी म्हटलं फ्लॉप, खिल्ली उडवत म्हणाले, “हे नको करुस…”

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

पुढे तो म्हणाला, “मग धाडसाने त्या माणसाने किडा मारला. मग तो माणूस हिरो झाला. संपूर्ण गाव त्याला मान देत असे. प्रत्येकजण आनंदी होता आणि पुढच्या अनेक रात्री सगळे शांतपणे झोपले”. यानंतर जयदीपच्या तोंडावर जखमेच्या खुणा दिसत आहेत आणि तो सांगतो की, एका रात्री त्याच्या पलंगाखाली काहीतरी सरकले. तिथे एक किडा होता. मग दहा किडे, हजार, लाख, कोटी आणि अगणित किडे. त्याला काय वाटले की त्याने एक कीटक मारला तर खेळ संपला, अंडरवर्ल्डमध्ये असे क्वचितच घडते.

आणखी वाचा – Video : डिपीला शॉपिंगला घेऊन गेली अंकिता वालावलकर, धनंजय दुकानात जमिनीवरच मांडी घालून बसला अन्…; व्हिडीओ व्हायरल

अविनाश अरुण धवरे दिग्दर्शित, ‘पाताल लोक’ सीझन २ मध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग, गुल पनाग, तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ सारखे दिग्गज कलाकार आहेत. पाताल लोक सीझन २ १७ जानेवारीपासून खास प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

Tags: bollywood webseriesPaatal Lok 2Paatal Lok 2Teaser Out
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial update Bhuvaneswari will know the truth that Akshara will become mother

अक्षरा आई होणार असल्याचं सत्य भुवनेश्वरीला समजणार, अधिपतीशी बोलण्यासाठी धडपड, एकत्र कधी येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.