शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला जान्हवी कपूर डेट करत असल्याचं खरं ठरलं, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, “शिखूचे…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2024 | 5:53 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
koffee with karan 8 actress janhavi kapoor accidently took name of rumoured boyfriend shikhar pahariya

सुशील कुमार शिंदेंच्या नातवाला जान्हवी कपूर डेट करत असल्याचं खरं ठरलं, अभिनेत्रीनेच केला खुलासा, म्हणाली, "शिखूचे…"

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’ हिंदी टीव्हीमधील सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या शोजपैकी एक आहे. या शोमध्ये आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये अनेक गंमतीजमती होतात, शिवाय या शोमधील कलाकारांची वक्तव्येही अनेकदा चर्चेत आलेली आहेत. या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली आहे. (Koffee With Karan New Promo)

अशातच या शोमध्ये आगामी भागात कपूर सिस्टर्स हजेरी लावणार आहेत. जान्हवी व खुशी कपूर या बहिणी करण जोहरच्या शोच्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार असून यावेळी जान्हवीने शिखर पहाडियाबरोबरच्या तिच्या नात्याचे काही संकेतही दिले आहेत. यावेळी रॅपिड फायर या राऊंडदरम्यान, जान्हवीला तिच्या स्पीड डायलवरील तीन व्यक्तींच्या नंबरबद्दल विचारले असता, यावर जान्हवी प्रथम तिचे वडील बोनी कपूर यांचे नाव घेते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ती खुशू म्हणजेच खुशी असल्याचे सांगते आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ती नकळत तिच्या कथित प्रियकर शिखूचे (शिखर पहाडियाचे) नाव घेताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते?’ मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा सोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा काही खास फोटो

शिखर पहाडीया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहेत. जान्हवी व शिखर हे अनेकदा रेस्टॉरंट्स, पब, पार्ट्यांमध्ये स्पॉट झाले आहेत. मात्र त्यांनी अद्याप त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कुठेही सांगितलेले नाही. यावेळी ‘कॉफी विथ करण’च्या या भागात दोन्ही कपूर सिस्टर्सनी त्यांच्या खास स्टायलिश लुकमध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी जान्हवीने लाल रंगाचा मोठा गाऊन परिधान केला आहे  तर तिची बहीण खुशीने पिवळ्या रंगाचा वन-पीस परिधान केला आहे. या लुकमध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र या प्रोमोचीच चर्चा सुरू आहे.  

आणखी वाचा – Video : “पूर्ण कपडे न घालता…”, मौनी रॉयचा नवऱ्यासह स्विमिंग पूलमधील ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “लाज बाळगा आणि…”

दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आगामी काळात  तिचा ‘एन.टी.आर.३०’ व ‘बडे मिया छोटे मिया’ हे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच ती वरुन धवनबरोबरच्या ‘बवाल’ या चित्रपटात दिसली होती. तर खुशीने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यामध्ये ती सुहाना खान व अगस्त्य नंदा यांच्यासह मुख्य भूमिकेत होती.       

Tags: entertainmententertainment newsentertainment updatejanhvi kapoorkofee with karan 8
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Nupur Shikhare and Ira Khan Wedding Marathi News

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : साधा कुर्ता, सजावट करणंही टाळलं अन्…; आमिर खानच्या लेकीच्या होणाऱ्या नवऱ्याने घरीच केला हळदी कार्यक्रम, अवाढव्य खर्च टाळला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.