Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरी लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसह लग्नबंधनात अडकणार आहे. नववर्षाच्या स्वागताला म्हणजे ३ जानेवारीला ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. आमिर खानच्या लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. लग्नसाठी आमिर खानचं घरही रोषणाईने उजळून निघालेलं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने या दोघांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे.
आजपासून आयरा व नुपूरच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुपूर शिखरेच्या घरी आज हळदी समारंभाला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. हळदीसाठी नूपुरच्या घरी लगबग सुरु झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान आमिर खानच्या जावयाच्या हळदीसाठीच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुपूर शिखरेच्या हळदीसाठीच्या अत्यंत साध्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नूपुरचा हळदीसाठीचा कुर्ता पायजमा असा अत्यंत साधा लूक विशेष भावतोय. शिवाय समोर आलेल्या नूपुरच्या हळदी समारंभातील त्याच्या आईच्या साध्या लूकने व साधेपणानेही साऱ्यांचं लक्ष वेधलं.
नुपूरच्या घरी हळद समारंभाची धामधूम पाहायला मिळत आहे. आमिर खानच्या लेकीच्या लग्नात त्याची पत्नी किरण राव व रिना दत्त यांचा सहभाग पाहायला मिळाला. नूपुरच्या घरी हळदीसाठी त्यांची पारंपरिक अंदाजातील हजेरी अधिक लक्षवेधी ठरली. दोघींनी नऊवारी साडी परिधान करत केसात गजरा माळल्याचे पाहायला मिळाले. दोघींचा व इतर कुटुंबीयांचा हा पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.
आमिरचा होणार जावई नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. त्याने Fitnessism ची सुरुवात केली. एवढंच नाही तर तो फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणूनही ओळखला जातो. तो खूप आधी आयरालाही प्रशिक्षण देत होता. विशेष म्हणजे नुपूरने आयराचे वडील आणि सुपरस्टार आमिर खान यालाही ट्रेनिंग दिली आहे. आमिर खान आणि आयरा खान व्यतिरिक्त नुपूरने सुष्मिताला जवळपास दशकभर प्रशिक्षण दिलं आहे. तसेच मोठ्या सेलिब्रिटींना तो ट्रेन करताना दिसतो. नुपूर राज्यस्तरीय टेनिसपटूही राहिला आहे.