‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. गेली सव्वाचार वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिका सुरु झाली तेव्हापासून प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांना डोक्यावर उचलून धरलं. यादरम्यान बरेचदा मालिकेतील कलाकारांना आणि कथानकाला ट्रोलही केलं गेलं. (Aai Kuthe Kay Karte Promo)
सध्या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अभिवर खूप मोठं संकट कोसळलेलं असतं. अभिने काही व्यक्तींकडून उसने पैसे घेतलेले असतात. मात्र त्याने याबाबत घरात काहीच सांगितलेलं नसतं. अशातच अचानक अभिच हे सत्य घरातल्यांसमोर येतं. त्यावेळी अभि अरुंधतीकडे पैसेही मागतो. मात्र अरुंधती पैसे द्यायला स्पष्ट नकार देते. यानंतर अभिने पैसे घेतलेली माणसं घरीसुद्धा येतात. तेव्हा अभि खूप घाबरतो. कांचनही अरुंधतीला अभिला मदत कर त्याला गरज आहे असं म्हणते.
त्यावेळी अभि अरुंधतीला, “तू किती आतल्या गाठीची आहेस. इथे राहत होतीस, खात-पीत होतीस, कशी या सगळ्याचा हिशोब केला आहेस का?”, असं स्पष्टपणे म्हणतो. अभिच्या या बोलण्यावर अरुंधतीचा राग अनावर होतो. अरुंधती अभिला बोलते, “हिशोब करायचा आहे तर तीस वर्षांपासून सुरुवात करूया की त्याआधी नऊ महिने पोटात वाढवलं तेव्हापासून सुरुवात करूया. आजकाल पोटात मूल वाढवायचेही पैसे घेतात अभि. तू माझा तीस दिवस इथे राहण्याचा खर्च काढतोय. मला तुझ्या तीस वर्षांचा हिशोब दे”, असा अरुंधती अभिला जाब विचारताना दिसत आहे.
अभिला पैसे वेळी परत न करता आल्याने मारही खावा लागतो. दरम्यान रक्कम मोठी असल्याने घरातील कोणीही अभिला मदत करु शकत नाहीत. मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अरुंधती देशमुखांकडे येते तेव्हा सगळेजण अभिबरोबर बसून पैशांबाबत विचार करत असतात. अरुंधतीला आलेलं पाहून संजना म्हणते, “अरुंधती तू इथे काय करत आहेस. अभिच्या जखमेवर मीठ चोळायला आली आहेस का?”, यावर अनिरुद्ध म्हणतो, “अरुंधती तुझ्या पैशांची आम्हाला गरज नाही आहे”. यावर यश सांगतो, “सगळ्यांनी नीट कान देऊन ऐका, आईने त्या गुंडाचे पैसे दिले आहेत”. अरुंधतीचा अपमान होताच ती निघून जात असताना अभि उठतो आणि “आई थँक यु”, असं म्हणतो. शेवटी आईच मुलाच्या संकटावेळी तिच्या मदतीला धावून आली. त्यामुळे अरुंधती म्हणजे आई कुठे काय करते या वाक्याला पुन्हा एकदा कथानकाने केंद्रित केलं आहे.