बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी काही दिवसांपूर्वी एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तीन जून रोजी वरुन व नताशा आई-बाबा झाले आहेत. आणि दोघांनी आपल्या लेकीचे स्वागत केले आहे. वरुण-नताशाच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुडन्यूज दिली आहे. लेकीच्या येण्याने धवन कुटुंबात खूप आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. वरुन व नताशा या दोघांवर चाहतेमंडळी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी सून नताशाच्या प्रकृतीबाबत अपडेटही दिली आहे. नताशा आणि तिची लेक रुग्णालयात असून त्यांना अद्याप डिस्चार्ज मिळालेला नाही. त्यामुळे वरुनच्या जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीय रुग्णालयात जाताना दिसत आहेत. (David Dhawan Gives Update On Natasha Dalal)
या पापाराझींनी वरुनचे वडील डेव्हिड धवन यांना नताशाच्या प्रकृतीबद्दल विचारले. सूनेच्या प्रकृतीबाबत भाष्य करत डेव्हिड म्हणाले की, “नताशाची तब्येत उत्तम आहे”. वरुण व नताशा यांनी अद्याप बाळाच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्याने आपल्या पोस्टमध्ये त्यांच्या बाळाला बेबी धवन असेही म्हटले होते. बाळाच्या जन्माची घोषणा करत वरुणने पोस्ट लिहीत असे शेअर केले की, “आमच्या बाळाचे या जगात स्वागत आहे. आई आणि बाळाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा. कृष्ण हरे हरे”.
वरुणबद्दल असे म्हटले जात आहे की, तो खरोखरच जगातील भाग्यवान पिता असेल, कारण त्याने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. करणने वरुणला विचारले होते की, “तुझ्याकडे अशी कोणती गोष्ट हवी आहे जी तुझ्याकडे आता नाही?”. स्टुडंट ऑफ द इयर स्टार वरुण धवनने शाहिद कपूरचे नाव घेत “मलाही त्याच्या मुलीसारखी मुलगी हवी आहे”, असे म्हटले होते. जरी त्यावेळी वरुणचे लग्न झाले नसले तरी त्याचं हे भाष्य आता वडील झाल्यावर चर्चेत आलं आहे.
वरुण व नताशाबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनी २४ जानेवारी २०२१ रोजी अलिबागमध्ये लग्न केले. असे म्हटले जाते की, वरुण व नताशा शाळेपासून एकत्र आहेत. आधी दोघे चांगले मित्र होते, नंतर वरुणने नताशाला इम्प्रेस करुन तिला आपली मैत्रीण बनवले. वरुणने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, नताशाने त्याला चार वेळा नकार दिला होता, पण वरुणने हार मानली नाही आणि तिचं मन जिंकलं.