Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या पर्वात काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा वावरही पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील हे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या रील व्हिडीओने प्रेक्षकांच्या मनाला नेहमीच भुरळ घालतात. अशाच या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा यंदाच्या पर्वातही पाहायला मिळाली. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पवार म्हणजेच डीपी दादाची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. डीपीने पहिल्या दिवसापासून घरात तग धरुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. सोशल मीडियावर डीपीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
नेहमीच काही ना काही शेअर करत तो त्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याचे रील व्हिडीओ ही तुफान वायरल होताना पाहायला मिळतात. सध्या डीपी ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसतोय. ‘बिग बॉस’च्या घरात वावरत असताना तो वेळोवेळी कुटुंबीयांच्या आठवणीत भावुक होतानाही दिसला. अशातच कुटुंबीयांच्या भेटीचा आठवडा सुरु असून डीपीच्या घरुन त्याच्या वडिलांची व आई- बायकोची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. कधीही वडिलांनी आपलं कौतुक केलं नाही अशी तक्रार करणाऱ्या डीपीच्या वडिलांच्या एंट्रीने डीपीला अश्रू अनावर झाले. आणि तो ढसा ढसा रडू लागला. वडिलांनी घरात एन्ट्री करताच सगळ्यांना नमस्कार केला आणि ते डीपी जवळ येऊन त्याला धरुन रडू लागले.
वडिलांना रडताना पाहून डीपीच्याही अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर ‘बिग बॉस’ने डीपीला रिलीज केलं तेव्हा डीपी वडिलांना घट्ट मिठी मारुन रडला. वडील हे नेहमी वडीलच असतात. मनात बरंच काही असलं तरी ते कधीच बोलून दाखवत नाहीत, अशा वडिलांचा लेकाला तब्बल दोन महिन्यांनी पाहून बांध फुटला. डीपी व त्याच्या वडिलांना पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले. त्यानंतर डीपीने त्याच्या वडिलांना खाली वाकून नमस्कार केला आणि त्यांना बेडरूम एरियामध्ये घेऊन जात त्यांच्या दुखणाऱ्या पायाची सेवा केली आणि घरातल्यांचीही विचारपूस केलेली पाहायला मिळाली.
शिवाय डीपीच्या भेटीसाठी त्याची बायको व त्याची आई सुद्धा आलेली दिसली. बायकोला पाहून डीपीचेही अश्रू अनावर झालेले दिसले. आईच्या पाया पडत त्याने तिचे आशीर्वाद घेतले आणि तिच्या तब्येतीची काळजी घेतली. तर बायकोला मिठी मारत तो भरपूर रडला. त्यांनी सगळे चांगले खेळतात, असं म्हणत सगळ्यांचं कौतुक केलेल पाहायला मिळालं.