शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा होणार, गरोदर असल्याचं सांगत शेअर केला फोटो, जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 28, 2025 | 2:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kiara Advani And Siddharth Malhotra Shared Goodnews

कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा होणार, गरोदर असल्याचं सांगत शेअर केला फोटो, जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Kiara Advani And Siddharth Malhotra Shared Goodnews :बॉलिवूड सिनेविश्वातून एकामागोमाग एक आनंदाच्या बातम्या येत आहेत. अशातच एका कलाकार जोडीने दिलेल्या आनंदाच्या बातमीने अनेकांच्या नजरा वळविल्या आहेत. आणि ही कलाकार जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. कियारा व सिद्दार्थ यांनी आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. या गुयडन्यूजने अनेकांच्या नजरा वळल्या असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत त्यांनी त्यांना बाळ होणार असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. ही बातमी पोस्ट करुन त्यांनी साऱ्यांना गोड सरप्राईज दिलं आहे.

सिद्धार्थ व कियारा यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. “आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे”, असं खास कॅप्शन देत त्यांनी चिमुकल्या बाळाचे मोजे हातात घेत फोटो पोस्ट केला आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांनी आई-बाबा व्हायचा निर्णय घेतला आणि अखेर आता हे जोडपे त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. बाळ होणार असल्याची गुडन्यूज देताच त्यांच्या चाहतेमंडळींकडून आणि सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – ‘मैत्रीचा ७/१२’ मधील अतरंगी मित्रांची ओळख, संचिताचा बॉसी स्वभाव भारी पडणार की मैत्री होणार?

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची पहिली भेट २०१८ मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. सिद्धार्थ आणि कियारा यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. बरेचदा कियारा व सिद्धार्थ एकत्र स्पॉट होताना दिसतात. आता आनंदाची बातमी दिल्यानंतर त्यांचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये कियाराने सांगितलं होतं की, दोघांची पहिली भेट ‘लस्ट स्टोरीज’च्या रॅप अप पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली.

आणखी वाचा – Video : कौतुकास्पद! विकी कौशलने सादर केली मराठीत कविता, स्पष्ट उच्चार ऐकून उपस्थितही भारावले, व्हिडीओ एकदा पाहाच

‘शेरशाह’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर कियारा व सिद्धार्थ बरेचदा एकत्र दिसू लागले. आणि यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा या समोर येऊ लागल्या. २०२२ मध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सिद्धार्थ आणि कियारा मालदीवमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Tags: bollywood newsKiara Advani And Siddharth MalhotraKiara Advani And Siddharth Malhotra Shared Goodnews
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Sunita Ahuja Reveals Real Reason Of Divorce

"तरुण मुलगी आहे, शॉर्ट्समध्ये वावरते…", गोविंदापासून दूर राहण्याचा पत्नीने केला खुलासा, म्हणाली, "या जगात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.