मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गायक डीनो जेम्सने पटकावले ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वाचे विजेतेपद, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला टाकलं मागे, मिळाली ट्रॉफी, कार व इतकी रक्कम

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 15, 2023 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Khatron ke Khiladi 13 Grand Finale

गायक डीनो जेम्सने पटकावले 'खतरों के खिलाडी'च्या १३ व्या पर्वाचे विजेतेपद

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. नुकताच या शोच्या १३व्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हा शो होस्ट करतो. ज्यामध्ये गायक डीनो जेम्सने आपल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर या शोचे विजेतेपद पटकावले. (Khatron ke Khiladi 13 Grand Finale)

कलर्स हिंदी वाहिनीवर ‘खतरों के खिलाडी १३’ हा शो जुलै महिन्यात सुरु झाला होता. तेव्हापासून तो बराच चर्चेत होता. काल या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. ज्यामध्ये डीनोसह मराठमोळा शिव ठाकरे, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा हे स्पर्धक पोहोचले होते. या सर्व स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर डीनोने उत्कृष्ट स्टंट करत शोचे जेतेपदावर नाव कोरले. यावेळी विजेता ठरलेल्या डीनोला ट्रॉफी व २० लाखांच्या रोख रकमेसह एक आलिशान कार मिळाली आहे.

हे देखील वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’मध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळणार, घरात येणाऱ्या कपलला मिळणार वेगळी रुम, नेमकं काय घडणार?

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘खतरों के खिलाडी’च्या यंदाच्या पर्वात रश्मीत कौर, डीनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, अर्चना गौतम, नायरा बॅनर्जी, साउंडस मौफकीर, शिव ठाकरे, अर्जिता तनेजा, अंजली आनंद, रोहित बोस रॉय, रूही चतुर्वेदी, अंजुम फकीह, डेजी शाह आणि शीझान खान हे स्पर्धक सहभागी झाले होते. तब्बल १३ आठवडे चालेल्या या शोमध्ये या सर्वच स्पर्धकांनी खतरनाक स्टंट्स करत प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं.

हे देखील वाचा – Ind Vs Pak Match : भारत-पाकिस्तान मॅचवरून नेटकऱ्यांना आठवला जेठालाल, सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल

सोशल मीडियावर या शोची जितकी चर्चा झाली होती, तितकीच चर्चा यांमधील सहभागी स्पर्धकांची देखील झाली होती. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये या शोचे शूटिंग सुरु होते. २ ऑक्टोबरला ते संपल्यावर रोहित शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पर्धक आणि प्रेक्षकांचे आभार मानले होते.

Tags: dino jameshindi tv showkhatron ke khiladi 13Khatron ke Khiladi 13 Grand Finalerohit shetty
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Prithvik Pratap shared a Throwback photos

"माझी चप्पल अन् फॅारेनर यावर…" अमेरिकेतील फोटो शेअर करत पृथ्वीक प्रतापची भन्नाट पोस्ट, नेटकरी म्हणाले, "कॅप्शन वाचल्यानंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.