शिरोडकर, प्राजक्ता तर आता मीराच्या भूमिकेतून केतकीच रुपेरी पडद्यावर पुन्हा आगमन…

ketki mategoankar
ketki mategoankar

शाळा म्हणली की गणवेश, वह्या पुस्तकं आठवतात पण एकवेळ अशी आली होती कि शाळा हे नाव ऐकलं की आठवते ती म्हणजे ‘शिरोडकर’. ‘शाळा’ या चित्रपटात शालेय जीवनावरील प्रेम या विषयावर चित्रीकरण करण्यात आलं या मध्ये शिरोडकर ही भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर ने साकारली आणि प्रेक्षकांच्या ती चांगलीच पसंतीस पडली. गायना सोबतच केतकी अभिनय क्षेत्रात ही सक्रिय झाली. शाळा चित्रपटानंतर काकस्पर्श, टाइमपास, फुंतरू अशा अनेक चित्रपटांमध्ये केतकीने आपल्या अभिनयाची छाप सोडली.(ketki mategoankar)

हे देखील वाचा – “आत्महत्या करणार असाल तर…”


बऱ्याच कालावधी नंतर केतकी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. केतकीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ही माहिती शेअर केली आहे. ‘मीरा’ हे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. याआधी शिरोडकर, प्राजक्ता ही केतकीने साकारलेली पात्र आज हि प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहेत तर या चित्रपटातील केतकीच पात्र प्रेक्षकांना किती आवडणार हे पाहन उत्सुकतेचं ठरणार आहे.(ketki mategoankar)

हे देखील वाचा – आई कुठे काय करते मधून या अभिनेत्रीची एक्जिट तर ‘या’ नव्या मालिकेत एन्ट्री


या सोबतच काही दिवसांपासून शाळा चित्रपटातीलं जोशी-शिरोडकर या जोडी संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत होती या पोस्ट वर केतकी ने ‘शिरोडकर लवकरचं पुन्हा येणार आहे’ अशी कमेंट केली आहे. यावरून शाळा २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे संकेत केतकी ने दिले आहेत. या कमेंट वर प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर पुन्हा एकदा शिरोडकरला पाहण्यासाठी प्रेक्षकी उत्सुक असल्याचे दिसत आहेत.(ketki mategoankar)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Anibani
Read More

जून महिन्यापासून लागू होणार ‘आणीबाणी’ राजकारणावर परखड भाष्य करणारी कथा

हल्ली कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर चित्रपटांची कथानक रचली जातात. समाजातील कोणतीही घटना, गोष्ट असो त्यावर…
Prarthana Behere
Read More

प्रार्थना निघाली लंडनला,कुशलसोबत झळकणार चित्रपटात?

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सध्या तिच्या स्टायलिश अंदाज आणि तिच्या सहज सुंदर अभिनय कौशल्यामुळे नेहमी चर्चेत असते.…
vanita kharat rohit shetty
Read More

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात वनिता खरातची वर्णी

कोळीवाड्याची रेखा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिताने तिच्या विनोदी…
Satya Manjrekar controversy
Read More

‘वेडात मराठे वीर दौडले सात; चित्रपटात सत्या मांजरेकरच्या जागी या अभिनेत्याची एन्ट्री?

हल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील शूर योद्धे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. अनेक चित्रपट…
Lata Mangeshkar Maharashtra Shahir
Read More

महाराष्ट्र्र शाहीर या आगामी चित्रपटात गानकोकिळा लता मंगेश यांच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

महाराष्ट्राला लाभलेल्या महान विभूतींपैकी एक ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. ‘जय जय महाराष्ट्र माझा..’…