मालिका विश्वातील आघाडीची वाहिनी स्टार प्रवाह आणि या वाहिनी वरील बरेच विषय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. स्टार प्रवाह वाहिनी वरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. घरातील आई हे पात्र किती महत्वाच आणि एका आईचा संघर्ष या मालिकेत दाखविण्यात आला आहे. स्त्रीचं आयुष्य कस चालत वा कस चालावं यावर ही कथा चित्रित करण्यात येत आहे. या मालिकेतील अरुंधती हे पात्र विशेषतः चर्चेचा विषय ठरलं आहे. तर या पात्रा सोबतच मालिकेतील अन्य पात्र ही प्रेक्षकांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरली आहेत.(Aai kuthe kay karte)
====
हे देखील वाचा – “आत्महत्या करणार असाल तर…”
====
सध्या मालिकेत नातीच्या नामकरण सोहळ्याचा त्याचबरोबर अरुंधती च्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. यासोबत आणखी एक पात्र तितकंच लोकप्रिय झालं ते म्हणजे गौर.गौरी हे पात्र अभिनेत्री गौरी कुलकर्णी साकारताना दिसते.तर आता यश देशमुखची होणारी बायको आणि अरुंधतीची होणारी सून गौरी हिने मालिकेतून नुकतीच एक्झिट घेतली. ती लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.(Aai kuthe kay karte)
गेल्या अनेक दिवसांपासून गौरी ही मालिकेत पाहायला मिळतं नव्हती.तसेच गौरी आणि यश या दोघांमध्ये वाद होत असल्याचे गौरी यशच्या आयुष्यातून निघून तिच्या आई बाबांकडे अमेरिकेला निघून गेली. त्यानंतर गेल्या कित्येक दिवसांपासून ती या मालिकेत झळकली नाही. त्यामुळे अनेक प्रेक्षक हे नाराजी व्यक्त करत होते. तर तिने ही मालिका सोडली का अस देखील विचारतं होते तर आता तिने मालिकेतून एक्झिट घेतल्याचं समोर आलं आहे. तर यासोबत तिने चाहत्यांना आंनदाताची बातमी दिली.ती लवकरच एका नव्या मालिकेत दिसणार आहे.
सन मराठीवर ‘प्रेमास रंग यावे’ या नव्या मालिकेत गौरी कुलकर्णी झळकणार आहे. यात तिची भूमिका काय असणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तिला पाहण्यास चाहते मात्र प्रचंड उत्सुक आहेत.(Aai kuthe kay karte)