काही कलाकारांच काम आणि विचार बोलके असतात त्यायादी मधल एक नाव म्हणजे संकर्षण कऱ्हाडे(sankarshan kharade). रुपेरी पडदा असो व रंगमंच संकर्षणच्या अभिनयाचं पारडं नेहमी जड असतं. अभिनयासोबतच एखाद्या विषयावर तेवढच परखड मत असणं ते जगासमोर मांडणं हे ही कसब संकर्षणला चांगलंच अवगत आहे. संकर्षण परभणीहून मुंबईत आला आणि त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली अनेक नाटकं, एकांकिका, चित्रपट, मालिका या घटकांमध्ये अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
अभिनयासोबतचं संकर्षण कवी, लेखक, निवेदक या भूमिका सुद्दा लीलया पार पडतो. अलीकडेच इट्स मज्जाला दिलेल्या एका मुखतातीत संकर्षणने(sankarshan kharade) अभिनयासाठी बाहेर गावावरून शहरात येण्याऱ्या तरुण, तरुणींनी काय करावं आणि काय करू नये, घरातून निघण्याआधी कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
====
हे देखील वाचा – वनिता खरातचं प्री वेडिंग फोटोशूट,पृथ्वीकने दिले हटके कॅप्शन्स
====
कला क्षेत्रात नव्याने येणाऱ्या पिढीला संगर्षण सल्ला देताना म्हणतो “मराठवाडा असो किंवा कोणत्याही जिल्ह्यातून मुंबईकडे आपलं आयुष्य घडवण्यासाठी येणाऱ्या तरुणांनी स्वतःची आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक परिस्थती योग्य आहे का हे पाहूनच घर सोडावं.” पुढे संकर्षणे(sankarshan kharade) हे मुद्दे का लक्षात घयावेत हे स्पष्टीकरण सुद्दा दिल आहे तो म्हणाला “आर्थिक परिस्थती यासाठी पाहावी कारण इथे आल्यावर लगेच तुम्हाला कोणी दिवसाला ५००० देणार नाही, ६ महिने वर्षभर काम मिळालं नाही तरीही स्वखर्चाने भाड भरून राहावं लागेल ते जमणार आहे का? आर्थिक परिस्थती सोबतच मानसिक परिस्थती हि तेवढीच सक्षम असाव. लवकर काम मिळालं नाही किंवा मिळालेल्या कामातून काढून टाकण्यात आलं तर लगेच तुम्ही आत्महत्या हा पर्याय निवडणार असाल तर नका येऊ” असं संकर्षण म्हणतो.
तरुण पिढीला संकर्षणचा सल्ला
मिळेल ते काम करण्यासाठी आपण शारीरिक दृष्ट्यासुद्धा तेवढ तयार असणं गरजेचं आहे. कलाकाराला वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये अनिश्चित काळासाठी काम करावं लागत त्यासाठी आपली तेवढी तयारी हवी. तेव्हा कोणतेही कारणं देऊन चालत नाही असं देखील संकर्षण(sankarshan kharade) म्हणाला.
या महत्वाच्या जबाबदाऱ्यांसोबतच अजून एका जबाबदारीच भान ठेवून तरुणांनी किंवा तरुणींनी घर सोडून मायानगरीत यावं ती जबाबदारी म्हणजे कुटुंबाची सहमती जर तुमच्या इथे येण्याने घरच्यांना काही आर्थिक किंवा सामाजिकत्रासाला सामोरं जावं लागणार असेल तर इथं येऊ नका जिथे आहेत तिथेच एखादा धंदा, व्यवसाय बघा त्यामुळे घरच्यांनाही त्रास होणार नाही हा महत्वाचा मुद्दा देखील संकर्षण ने(sankarshan kharade) त्याच्या मुलाखतीत मांडला आहे.
1 comment