‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून आणि आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी अभिनेत्री केतकी माटेगांवकर. गायनासह अभिनयाची आवड जपत तिने ‘तानी’, ‘शाळा’, ‘टाइमपास’, तसेच ‘काकस्पर्श’सारख्या चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत केतकीने प्रेक्षकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आपल्या अभिनय व गाण्यामुळे चर्चेत राहणारी केतकी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते.
केतकी सोशल मीडियावर आपले अनेक फोटो, गायनाचे व्हिडीओ शेरक करत असते. याचबरोबर ती काही सामाजिक विषयांमवरदेखील भाष्य करत असते. नुकतंच तिने एक खास पोस्ट शेअर करत निसर्ग संवर्धनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विनंती केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. अशातच तिची आणखी एक पोस्ट साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

केतकीने नुकताच इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रश्न-उत्तरांचा सेगमेन्ट घेतला होता. यावेळी केतकीला तिच्या एका चाहत्याने तिच्या रिलेशनशिप स्टेट्स बद्दल विचारले. यावर केतकीने “मी देवाच्या, मित्रांच्या, माझ्या कुटुंबियांच्या आणि त्याचबरोबर माझ्या संपूर्ण चाहत्यांच्या प्रेमात आहे” असं हटके उत्तर दिलं आहे. दरम्यान या प्रश्न-उत्तरांच्या सेगमेन्टमध्ये तिला चाहत्यांनी आणखी अनेक प्रश्न विचारले. ज्याची तिने अगदी मनमुरादपणे उत्तरे दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केतकीचा अंकुश नावाचा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात केतकीसह दीपराज, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी जबरदस्त कलाकार मंडळी होती.