‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात हवा केली आहे. ५० करोड हुन अधिक कमाई केलेल्या या चित्रपटाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेने हा चित्रपट दर्दी रसिकांच्या पसंतीस पडला आहे. या चित्रपटातील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची भूमिका आणि चित्रपटात त्यांच्या पतीची भूमिका यामध्ये काही खास किस्सा आहे. (Kedar Shinde Shares Casting Story)
चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी यांच्या पतीची भूमिका सतीश यांनी साकारली आहे. मात्र या भूमिकेसाठी त्यांची निवड नेमकी कशी झाली याचा उलगडा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केला आहे. शिवाय ती भूमिका साकारलेल्या सतीश यांचं भरभरून कौतुक ही केलं आहे.
पाहा कसं झालं रोहिणी ताईंच्या पतीचं कास्टिंग (Kedar Shinde Shares Casting Story)
बाईपण भारी देवा चित्रपटातील रोहिणी ताईंच्या नवऱ्याच्या भूमिकेबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, ‘असा नवरा आपल्याला मिळावा असं हा चित्रपट पाहून प्रत्येक बाईला वाटेल. प्रत्येक बाई वा स्त्री देव पाण्यात ठेवून आहे, सुकन्या ताईचं चित्रपटातील घर दाखवल आहे, त्या घराचं लोकेशन पाहण्यासाठी मी गेलो होतो. म्हणजेच शरद पोंक्षे यांचं जे घर आहे ते पाहण्यासाठी मी वासू आणि अजित दादा गेलो होतो.ते खरं घर शिरीष काकांचं आहे. लोकेशन पाहायला गेल्यावर दरवाजा उघडला तो या माणसाने. आणि हा माणूस विलक्षण हसला.(Rohini Hattangadi)
ते पाहून मी अजित दादा यांना विचारलं की हे चित्रपटात काम करतील का? तर अजित दादा म्हणाले कुठलं, तर मी म्हणालो रोहिणी ताईंच्या पतीचं. अजित दादांचा एकदम चेहरा पडला, त्यांनी असा विचार केला होता की ही भूमिका ते करणार होते. पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलं की, विचारून बघ. मी विचारल्यावर शिरीष काका अगदी हो म्हणाले. चित्रपटात मी त्यांना त्या भूमिकेसाठी घेतलं असलं तरी त्या भूमिकेसाठी आवाज मात्र अजित गोरे यांचाच दिला आहे.
