मराठी मनोरंजनविश्वातला सुपरस्टार अभिनेता अंकुश चौधरी आपल्या डॅशिंग व चतुरस्त्र अभिनयासाठी ओळखला जातो, तर दीपा परब हीही तितक्याच ताकदीची अभिनेत्री आहे. कॉलेजपासून असलेली दोघांची ही घट्ट मैत्री पुढे लग्नबंधनात अडकली. आज ती मनोरंजनविश्वातील सर्वात सुंदर जोडींपैकी एक बनली. अंकुश काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमासह अनेक सिनेमांमध्ये झळकला. तर दीपाने नुकतंच ‘बाईपण भारी देवा’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. (ankush chaudhari deepa parab)
नुकतंच केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्याला अजूनही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. सिनेमाने आतपर्यंत ५० कोटींहून अधिक कमाई केली असून सिनेमाला मिळालेल्या अफाट यशाबद्दल टीमने काल सक्सेस पार्टीचं आयोजन केलं. त्यावेळेस सिनेमाच्या कलाकारांनी हे यश जोरदार सेलिब्रेट केलं. सिनेमात अभिनेता पियुष रानडेने दीपा परबच्या नवऱ्याची भूमिका केली. नेमकं हाच मुद्दा पकडत दिग्दर्शक केदार यांनी दीपाचा रिअल लाईफ नवरा अंकुशला तू कधी सिनेमातील पियुषसारखं खऱ्या आयुष्यात वागलास का ? असा सवाल विचारताच अंकुशने ही कबुली दिली.
पहा अंकुशने काय दिली कबुली (ankush chaudhari gave a confession regarding deepa as her husband)
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अंकुशला विचारलं, की मी जेव्हा दीपाला बघतो, तेव्हा तिच्या डोळ्यात तिच्या नवऱ्याविषयीचं प्रेम दिसतं. पण मला असं वाटतं की, तू खऱ्या आयुष्यात कधी पियुषच्या व्यक्तिरेखेसारखं वागलास ? कधी त्याच्यासारखा हिंसक नवरा बनलयास ? यावर अंकुशने उत्तर दिलं, की हो मी पियुषसारखं खूपदा वागलो. पण प्रेमळ वागलो, तिच्या चांगल्यासाठीच केलंय.
पुढे अंकुशने सिनेमातील नायकांचं भरभरून कौतूक केलं. तो म्हणतो, या सिनेमातील सर्वच पुरुषांनी अप्रतिम काम केलेलं असून मी रोहिणीताईंच्या मिस्टरांची भूमिका करणाऱ्या माणसाला कधीच पाहिलेलं नव्हतं. पण त्यांना बघून मला असं विचार आला, की का असं माणूस घेतलाय ? ताईंबद्दल असं नाही पाहिजे. पण जेव्हा मी सिनेमा पाहिला, तेव्हा असं भरून आलं आणि म्हटलं, अरे काय माणूस आहे हा ! आपण आयुष्यात रोहिणीताईंच्या नवऱ्यासारखं राहायला पाहिजे, असं वागायला पाहिजे. त्यावर केदार म्हणतात, धन्यवाद तू रोहिणीताईंच्या नवऱ्यासारखं वागलास याची कबुली दिल्याबद्दल. (baipan bhari deva success party)
हे देखील वाचा : ‘लोकेशनच्या मालकाने साकारली रोहिणी ताईंच्या पतीची भूमिका’ केदार शिंदे यांनी केला खुलासा