‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री सना शिंदे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील ‘बहरला मधुमास…’ या गाण्याने तर सोशल मीडियावर चांगलीच हवा केली आहे. मराठी नाटक, चित्रपट यांमध्ये केदार शिंदे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली. आता मात्र केदार शिंदे यांच्या बाबतची धक्कादायक बाब समोर आली आहे. केदार शिंदे यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे.(kedar shinde instagram account hack)
यापूर्वी केदार शिंदे यांचं डिसेंबर महिन्यात फेसबुक अकाउंट हॅक झालं होत. तर दोन तीन महिन्याचा कालावधी होताच आता केदार शिंदे यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. केदार शिंदे यांच्या इंस्टाग्राम वरील ऑफिशिअल अकाऊंटवरून त्यांचे सर्व फोटो हटवण्यात आले आहेत.
पहा काय घडलं केदार शिंदे यांच्या सोबत – (kedar shinde instagram account hack)
दरम्यान एका तरुण मुलाचे दोन फोटो त्यांच्या अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. एकाच तरुण मुलाचे हे दोन वेगवेगळे फोटो आहेत. ज्यात एका फोटोत त्या मुलाने मास्क लावला आहे तर दुसऱ्या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय. या फोटोंवर त्यांचं अकाउंट हॅक झाल्याच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.(kedar shinde instagram account hack)

संपूर्ण महाराष्ट्रात केदार शिंदे यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचे अकाउंट हॅक झाल्याची बातमी कळताच मायबाप रसिक प्रेक्षकांनी फेक व्यक्तीच्या फोटोंवर कमेंट्सचा भडीमार केला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, ‘मुद्दाम केलं आहे कोणी तरी सरांचा भव्य दिव्य ड्रीम प्रोजेक्ट येत आहे त्यावर कोणाची तरी जळण झालेली दिसतेय’ असे म्हटलं आहे..
====
हे देखील वाचा – “शेवटी भेट झालीचं !” ‘या’ गायिकेला भेटून सावनी भावुक
====
तर दुसऱ्या युजरने ‘|| श्री स्वामी समर्थ || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||’ असे म्हटलं आहे, केदार शिंदे हे स्वामींचे भक्त आहेत, दररोज ते त्यांच्या अकाउंटवरून स्वामींच्या कथा पोस्ट करत असतात. तर आणखी एका युजरने ‘सरांचं अकाउंट पुन्हा हॅक झालंय’, ‘या फोटोतल्या तरुणानेच केदार शिंदेंचं अकाउंट हॅक केलं असावं,’ अशी कमेंट करत दावा केला जातोय.(kedar shinde instagram account hack)
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना मुद्दाम कोणीतरी वा जाणूनबुजून केदार शिंदे यांचं अकाउंट हॅक केलं आहे का ? याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही.