मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’

sonalee kulkarni New Marathi Movie Tararani
sonalee kulkarni New Marathi Movie Tararani

स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. ज्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केले, ज्यांची राजनीति आणि रणनीती इतिहासकारांनी गौरविली, बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक पुत्री, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या ग्रंथावर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. नुकतेच याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. (sonalee kulkarni New Marathi Movie Tararani)

टिझर मध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या, रणांगण गाजवणाऱ्या, आक्रमक राजकारणी छत्रपती ताराराणी यांची झलक दिसत आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे हे विलक्षण पर्व आहे जिथे एक युगप्रवर्तक सासऱ्याचे, पराक्रमी पित्याचे, कुशल राजकारणी अशा पतीचे  आणि शूर, गुरुसमान दिराचे छत्र हरवलेली तडफदार स्त्री औरंगजेबासारख्या बलाढय शत्रूविरुद्ध त्यांचे नेतृत्व करत आहे.

====

हे देखील वाचा-‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच केदार शिंदेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक

====

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ” चित्रपट हे समाजप्रबोधनाचे आणि समाजजागरणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणारे चित्रपट निर्माण होणे ही काळाची गरज आहे म्हणूनच  प्रत्येक पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत.”(sonalee kulkarni New Marathi Movie Tararani)

छत्रपती ताराराणींची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ” छत्रपती ताराराणी. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी. त्यांचे कार्य, कर्तृत्व दैदिप्यमान आहे. अशा तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Anibani
Read More

जून महिन्यापासून लागू होणार ‘आणीबाणी’ राजकारणावर परखड भाष्य करणारी कथा

हल्ली कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर चित्रपटांची कथानक रचली जातात. समाजातील कोणतीही घटना, गोष्ट असो त्यावर…
Prarthana Behere
Read More

प्रार्थना निघाली लंडनला,कुशलसोबत झळकणार चित्रपटात?

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही सध्या तिच्या स्टायलिश अंदाज आणि तिच्या सहज सुंदर अभिनय कौशल्यामुळे नेहमी चर्चेत असते.…
vanita kharat rohit shetty
Read More

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात वनिता खरातची वर्णी

कोळीवाड्याची रेखा म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. वनिताने तिच्या विनोदी…
Satya Manjrekar controversy
Read More

‘वेडात मराठे वीर दौडले सात; चित्रपटात सत्या मांजरेकरच्या जागी या अभिनेत्याची एन्ट्री?

हल्ली छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील शूर योद्धे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. अनेक चित्रपट…
Lata Mangeshkar Maharashtra Shahir
Read More

महाराष्ट्र्र शाहीर या आगामी चित्रपटात गानकोकिळा लता मंगेश यांच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

महाराष्ट्राला लाभलेल्या महान विभूतींपैकी एक ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. ‘जय जय महाराष्ट्र माझा..’…