सध्या टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’चे १६ वे पर्व अधिक चर्चेत आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे करत आहेत. याआधीची सर्व पात्र खूप हिट झाली आहेत. या पर्वातील अनेक स्पर्धकदेखील खूप यशस्वी ठरली आहेत. अशातच आता नवीन भागाची चर्चा सुरु आहे. नुकताच एक भाग पार पडला. यामध्ये पश्चिम बंगाल येथील कलकत्ताचे रोलओव्हर कंटेस्टन्ट सौरव चौधरी दिसून आले होते. एका सीए कंपनीमध्ये सीनियर अकाऊंट असिस्टंट सौरव यांनी आधीच्या एपिसोडमध्ये ८०,००० रुपये जिंकले होते. अमिताभ यांनी सौरवचे खूप कौतुक केले होते. सौरवने सांगितले की, “लक्ष्य साधण्यासाठी व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित साकारण्यासाठी खूप सारे पैसे जिंकायचे आहेत”. (kaun banega crorepati 16 )
अमिताभ यांनी गेम सुरु केल्यानंतर पहिला प्रश्न १,६०,००० रुपयांसाठी विचारला. ‘क्रोमियम व कोणत्या धातू नायक्रोमचा मुख्य घटक आहे ज्यादा उपयोग हिटर व टोस्टरमध्ये केला जातो? त्यावेळी सौरव अ हा पर्याय निवडतात आणि बोनसचे पैसे जिंकतात. सौरवने खुलासा केला की पूर्ण बोनस रक्कम वापरुन मी माझ्या आईच्या उपचार करणार आहे.
त्यांनी सांगितले की, सध्या आईवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढे अमिताभ यांनी ३,२०,००० रुपयांसाठी प्रश्न विचारला जातो. मानसरोवर तलावाच्या इथे चेमायुंडुंग ग्लेशियरमधून कोणत्या नदीचा उगम होतो? सौरवने सी पर्याय निवडला आणि ब्रह्मपुत्रा असे नाव सांगितले. हे उत्तर अचूक होते. त्यानंतर पुढे ६,४०,००० रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात येतो. रेल्वे सुरक्षा दलाचे नाव काय आहे जे हरवलेले सामान सुरक्षित व पुनस्थापित करते? यामध्ये त्याने ‘अमानत’ हा पर्याय निवडला. तसेच नंतर ५०,००,००० रुपयांसाठी विचारण्यात आला.
यावेळी विचारण्यात आले की, “कोणत्या क्रिकेटरने ऑस्ट्रेलिया व न्यूझिलँडमध्ये भारतातील उच्चायुक्त म्हणून काम केले आहे?” मात्र याचे उत्तर सौरव देऊ शकला नाही. यावेळी ते अनुमान लावतो की, दलिपसिंह हा पर्याय निवडतो. मात्र या उत्तराबद्दल त्याला खात्री नव्हती. तसेच २५,००,००० रुपये घेऊन शो सोडला. तुम्ही सांगू शकाल का या प्रश्नाचे उत्तर?