Hina Khan Health Update : टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. हिना खूप दिवसांपासून धैर्य एकवटून या कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. अभिनेत्रीची ही अवस्था पाहून चाहतेमंडळी व कलाकार मंडळींमध्ये काळजीच वातावरण पसरलं आहे. हिना खानने अलीकडेच तिच्या चाहत्यांना सांगितले की, गेले १५ ते २० दिवस तिच्यासाठी किती कठीण व वेदनादायी होते. हिनाने सांगितले की एवढ्या दुःखातही ती चेहऱ्यावर हास्य ठेवून कशी वावरते. हिनाच्या या धीट स्वभावाचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. एवढ्या मोठ्या संकटातून जात असतानाही तिने उपचाराशिवाय कामात कुठेही ब्रेक घेतलेला नाही. बरेचदा ती अनेक इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसते.
हिना खानने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने पुन्हा एकदा तिच्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. पोस्ट शेअर करताना हिना खानने लिहिले आहे की, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी या प्रवासात शारीरिक व मानसिकदृष्ट्या सर्वात कठीण गेले आहेत. या प्रवासात माझ्या शरीरावर जखमाही झाल्या पण मी घाबरुन न जाता या संकटाला सामोरी गेली. मी लढले, आणि आजही मी लढतेय”. हिना खानने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “सर्व वेदना आणि इतर गोष्टींना सामोरे जाण्यासाठी, मला सकारात्मकतेचं चक्र सुरु ठेवण्यासाठी या आशेने मुद्दाम हसत राहावं लागतं, की खरा आनंद नैसर्गिकरीत्या येईल आणि तसे घडले”.
आणखी वाचा – अनुराग कश्यपच्या लेकीचं थाटामाटात लग्न, भर मंडपात नवऱ्यासह रोमँटिक झाली आलिया, फोटो व व्हिडीओ व्हायरल
तिने पुढे असं म्हटलं की, “हसत राहणं हा माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांना संदेश आहे. जीवन फक्त सुरु राहते असे म्हणून पुढे जात नाही. प्रत्येक दिवशी परिस्थिती कशीही असली तरीही आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो. आशा आहे की, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील लढाईसाठी तुम्हाला अशीच ताकद मिळेल. आणि आलेल्या संकटावर आपण सर्व विजय मिळवू. त्यामुळे हसायला विसरु नका”. या वर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रिटींमध्ये हिनाचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. हिना खानने जगभरात भारताचा गौरव केला आहे. या बातमीने हिनाचे चाहते खूप खूश आहेत. मात्र, याबाबत अभिनेत्रीने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.
हिनाने चाहत्यांना आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हसत राहण्याची आठवण करुन दिली. हिनाच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करीत तिच्या हिमतीचे कौतुक केले आहे. हिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मुंबईतील हिवाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे.