‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वातून अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा चांगलाच चर्चेत आला होता. याआधी तो अनेक हिंदी मालिका व चित्रपटांमध्येदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मात्र अभिनेत्याच्या अकाली निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. मनोरंजन क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. ‘बिग बॉस’दरम्यान अभिनेत्री शहनांज गिल व सिद्धार्थ यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. शहनाजने वेळोवेळी सिद्धार्थवरचे प्रेम व्यक्त केले आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून ती सिद्धार्थबद्दल अनेक आठवणी शेअर करते. आज म्हणजे १२ डिसेंबरला सिद्धार्थचा वाढदिवस असतो यानिमिताने शहनाजने एक पोस्ट शेअर शेअर केली आहे. (shehnaaz gill on siddharth shukla)
‘बिग बॉस’च्या १३ व्या पर्वात सिद्धार्थ व शहनाजची जोडी खूप पसंत केली गेली. या शो दरम्यान दोघांमधील बॉंडिंग खूप मस्त होते. त्यांच्यामध्ये प्रेम, रोमान्स तर कधीकधी त्यांच्यामध्ये भांडणंदेखील बघायला मिळाली. मात्र सिद्धार्थचा मृत्यू झाल्यानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. सिद्धार्थच्या आठवणीमध्ये तिने एक व्हिडीओ सॉंगदेखील तयार केले होते. अशातच आता सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. तिने एक काळ्या रंगाच्या पेजवर आजची तारीख आणि महिना लिहिला आहे. शहनाजची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्या पोस्टमधून शहनाजचं दु:ख सहज दिसून येत आहे असंही नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे.

तिच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हा तुमचा भाग्यवान नंबर आहे. तो नेहमी तुमच्याबरोबर असेल”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यश मिळवण्यासाठी तसेच कोणतंही नवीन काम करताना नेहमी तुमच्याबरोबर राहणार आहे”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सिद्धार्थ जर आज असता तर तुझ्या यशाने त्याला खूप गर्व वाटला असता”. तसेच अजून एकाने लिहिले की, “सिद्धार्थ नेहमी आमच्या आणि तुझ्या हृदयात राहणार आहे”.
‘बिग बॉस’ संपल्यानंतर शहनाज व सिद्धार्थ एका म्युजिक व्हिडीओमध्ये एकत्रित दिसून आले होते. ही जोडीदेखील खूप पसंत केली गेली. मात्र २ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर शहनाजने खूप हिम्मतिने स्वतःला सावरलं.