अभिनेत्री श्रीदेवी या बॉलिवूड मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्या आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा ‘चलबाज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. य चित्रपटाला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या चित्रपटातील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. यावेळी रोहिणी विचित्र हेअर स्टाइलमध्ये दिसल्या होत्या. त्यांच्या केसांवर घरट्यासारखे तयार करण्यात आले होते. त्यावेळी नक्की हा सीन कसा शूट झाला? काय धमाल करण्यात आली? याबद्दल रोहिणी यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या अनेक आठवणीदेखील जाग्या केल्या आहेत. (Rohini Hattangadi on shridevi)
या चित्रपटामध्ये रोहिणी यांनी अंबा ही भूमिका साकारली होती. त्यांनी नुकताच आरजे दिव्या सोलगामाला मुलाखतीदरम्यान हा किस्सा सुनावला होता. विचित्र लाल रंगाच्या पंक हेअरस्टाइलमध्ये सेट व त्यांनी कसा वेळ घालवला? हे सांगितले आहे. रोहिणी म्हणाल्या की, “श्रीदेवी या स्वतःच त्यांचा मेकअप करायच्या, चेहऱ्यावर विनोदी छटा दिसावी यासाठी जाणूनबुजून खराब करायच्या”.
तसेच एका चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा रोहिणी यांनी शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, “एका सीनमध्ये माझे केस घरट्यासारखे बनवले जात होते. त्यामध्ये श्रीदेवीने द्राक्षदेखील ठेवले होते. यामध्ये अनुपम खेर, श्रीदेवी व मी होतो. मला अजूनही आठवतंय. श्रीदेवी त्या घरट्यात ठेवलेली द्राक्ष खात होत्या. हे खूप क्रिएटीव्ह होतं”.तसेच ‘गडबड हो गई’ या चित्रीकरणादरम्यानचा अनुभवदेखील शेअर केला आहे. यामध्ये खूप धमाल मस्ती दाखवण्यात आली आहे. रोहिणी यांनी ‘ना जाने जाने कहा से आयी है’ गाण्यांमध्ये श्रीदेवी यांची एनर्जी कमालीची असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्यामध्ये श्रीदेवी यांच्या अभियाने जीवंतपणा आणला होता असेही त्या म्हणाल्या.
रोहिणी यांनी सनी देओल व रजनीकांत यांच्या स्वभावाबद्दलदेखील म्हणाल्या की, “दोघंही खूप चांगले आहेत. त्यांचे स्वभाव उत्तम आहेत. सह-कलाकारांना ते खूप चांगल्या प्रकार समजून घेत असत”. चलबाज हा चित्रपट खूप आठवणींचा आहे. तसेच प्रेक्षकांच्याही खूप पसंतीस पडला.