कलाकारांचं सोशल आयुष्य हे कायमच चर्चेत असत.कलाकारांना भेटणं,त्यांचे ऑटोग्राफ घेणं त्यांच्या सोबत फोटो काढणं हे कायमच प्रेक्षकांसाठी खास असत.पंरतु त्यांच्या सोशल मीडियावर किंवा एखाद्या कार्यक्रमात किंवा प्रमोशन दरम्यान जेव्हा कलाकार भेटतात तेव्हा जसे ते असतात, तसेच रोजच्या जीवनात ही असतील याची काही खात्री नाही. (kareena kapoor Radhika Aapte)
याच संदर्भातील खुलासा दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केला आहे.त्यांचा मराठी तारका हा कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला.इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांचा एक व्हिडिओ पाहताना महेशना ८ वर्ष पूर्वीचा एक किस्सा आठवला. नारायण मूर्तींच्या व्हिडिओ मध्ये ते अभिनेत्री करीना कपूर विषयी बोले आहेत. महेशजींनी म्हंटले आहे, कुठं मूर्ती आणि कुठे करीना ? नारायण मूर्ती लंडनहून भारतात येत असताना, विमानात त्यांच्या पुढच्या सीट वर करीना कपूर बसली होती. तेव्हा काही लोक नारायण मूर्ती यांच्या जवळ येऊन, त्यांना अभिवादन करत होते,दोन शब्द बोलत होते, आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देत आहेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी सवांद साधत होते.
पाहा काय घडलं होत ? (kareena kapoor Radhika Aapte)
पण काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते, तरीही त्यांच्याकडे ती ढूंकुनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्तीना यांना खूप खटकली, आणि करीनाचा असला इगो काय कामाचा? असा प्रश्न देखील त्यांनी केला. या किस्यावरून महेश टिळेकरांना मराठी तारकाच्या वेळीचा ८ वर्षा पूर्वीचा एक किस्सा आठवला.मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंगसाठी असणाऱ्या रांगेत, ते उभे होते, तर त्यांच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती, तिचा पासपोर्ट दाखवून पुढे वळताना तिचा चेहरा दिसला,तशी आपली मराठी अभिनेत्री लाळघोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली.पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पुढे गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूरच्या एका लोकप्रिय सिनेमात एक नगण्य भूमिका केली होती तरी देखील करिनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही,फोटो काढणं तर दूरच. (kareena kapoor Radhika Aapte)
हे देखील वाचा : मेटा गाला मध्ये आलियाला ऐश्वर्या अशी हाक मारली तरी तिने राखले परिस्थतीचे भान
पण हेच स्वतःच्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल,तेव्हा जनमानसात मिसळून, चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरच तोड नाही.मागे एका इंटरव्ह्यू मध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो, सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना, असं सांगत होती.पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या काही इन्फ्लुएन्सर बरोबर सेल्फी देऊन स्वतःची प्रसिद्धी करून घेत होती.इतका विरोधामास यांच्या वागण्यात दिसून येतो. (kareena kapoor Radhika Aapte)