शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगामुळे वाईट अवस्था, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओद्वारे दाखवली सत्य परिस्थिती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 2, 2025 | 5:16 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva Rajkumar Cancer Free 

सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगामुळे वाईट अवस्था, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओद्वारे दाखवली सत्य परिस्थिती

Shiva Rajkumar Cancer Free  : कन्नड अभिनेता आणि निर्माता शिवा राजकुमार यांच्या आजारपणाबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. शिवा राजकुमार हे अभिनेते अनेक दिवसांपासून मूत्राशयाच्या कर्करोगाने त्रस्त होते. यानंतर आता ते कर्करोगमुक्त झाले असल्याचं समोर आलं आहे. शिवा राजकुमारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट शेअर केली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये केमोमुळे त्याचे केस गळले आहेत आणि तो खूप अशक्त झाला असल्याचं दिसत आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे शिवा राजकुमारने आता कॅन्सरशी लढाई जिंकली आहे.

६२ वर्षीय अभिनेत्याने व्हिडीओद्वारे आपला भावनिक प्रवास शेअर केला आणि आरोग्याबाबत अपडेट देत सांगितले की, मियामीमध्ये मूत्राशयाच्या कर्करोगावर उपचार सुरु आहेत. तेथे डॉक्टरांनी त्याचे मूत्राशय काढून दुसरे मूत्राशय बसवले आहे. व्हिडीओमध्ये शिवा राजकुमारने सांगितले की, “तो खूप घाबरला होता, पण चाहते, नातेवाईक आणि डॉक्टरांच्या पाठिंब्याने तो मजबूत झाला”. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, मियामीला उपचारासाठी जात असतानाही तो खूप घाबरला होता. पण पत्नी आणि कुटुंबीयांनी त्याची खूप काळजी घेतली.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायक अरमान मलिकचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याचा पहिला फोटो समोर, लूकची जोरदार चर्चा

View this post on Instagram

A post shared by DrShivaRajkumar (@nimmashivarajkumar)

शिवा राजकुमार यांनी सांगितले की, त्यांच्या किडनीचे मूत्राशय काढून दुसरे मूत्राशय बसवण्यात आले आहे. याशिवाय त्यांची केमोथेरपीही झाली. डॉक्टरांनी आता अभिनेत्याला आणखी एक महिना विश्रांती आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तब्येत ठीक झाल्यानंतर शिवा राजकुमारने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो लवकरच दमदार पुनरागमन करेल असे सांगितले.

आणखी वाचा – “अनेकदा आत्महत्येचा विचार केला तेव्हा…”, साजिद खानची अशी आहे परिस्थिती, म्हणाला, “घर विकलं, भाड्याने राहिलो तरीही…”

शिवा राजकुमार यांच्यावर डिसेंबरमध्ये कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मियामी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवा राजकुमार हा दिवंगत कन्नड स्टार पुनीत राजकुमारचा मोठा भाऊ असल्याची माहिती आहे. अभिनेता कॅन्सरमुक्त झाल्याचे जाणून चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला आहे.

Tags: Shiva Rajkumar Cancer Freeshiva rajkumar health updatesouth actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tharala tar mag fame actress Jui Gadkari commented that she wants to study law in the subject of criminal law

"२०२२मध्ये मी law साठी प्रवेश घेणार होते पण…", जुई गडकरीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "माझ्या आईचं स्वप्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.