बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरमान मलिकने आपल्या सुमधूर आवाजाने सर्वांना वेड लावलं आहे. अरमानचा भलामोठा चाहता वर्ग आहे. तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. अरमान बरीच वर्षे आशना श्रॉफबरोबर रिलेशनशीपमध्ये होता. त्याने २८ ऑगस्टला आशनाला प्रपोज करतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर त्याच्या साखरपुड्याचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर बघायला मिळाले.आशातच आता त्याच्या आता लग्नाबद्दलची माहिती समोर आली आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. त्याच्या लग्नातील गोड क्षण बघायला मिळत आहेत. (armaan malik wedding)
दरम्यान समोर आलेल्या फोटोंमध्ये पिच-नारिंगी रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तसेच यामध्ये दोघंही खूप सुंदर दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. दोघांचाही विवाह एका सुंदर आशा ठिकाणी पार पडला आहे. जे फोटो समोर आले. त्यामध्ये लग्नाच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट बघायला मिळत आहे. जवळची घरची मंडळी व मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला आहे. व्हिडीओ शेअर करत “तु ही मेरा घर” असं कॅप्शनदेखील दिले आहे.
आणखी वाचा – प्रिन्स नरुला व युविका चौधरीच्या लेकीचं बारसं, नाव ठेवलं एकदम खास, अर्थ आहे…
दरम्यान गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा पार पडला. त्यांचे साखरपुड्याचे फोटोदेखील शेअर केले आहेत. साखरपुड्याच्या दिवशी आशनाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. ज्यावर लाल, पिवळ्या व हिरव्या रंगाची प्रिंट केलेली साधी साडी होती. या लूकवर तिने डायमंडचे दागिनेही घातले होते. तर अरमानने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता.
अरमानने ऑगस्टच्या सुरुवातीला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले होते. तो त्याच्या लेडी लव्हला प्रपोज करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. त्यातील एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं होतं की, ‘आणि आमची कायमची सुरुवात झाली’. अरमानने आपल्या मधुर आवाजातून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. ‘मैं हूं हीरो तेरा’, ‘हुआ है आज पहली’, ‘बोल दो ना जरा’, ‘बेसाबरियां’, ‘तुम जो मिले’, ‘उफ ये नूर’, ‘तेरे दिल में’, ‘कौन तुझे ही’ त्यातलीच काही ही हीट गाणी आहेत.