शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“राजकारण हे पैसे कमावण्याचे…” लोकसभा निवडणुकांसाठी तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याकडे जे काही आहे ते…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 26, 2024 | 10:55 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kangana ranaut on politics

“राजकारण हे पैसे कमावण्याचे...” लोकसभा निवडणुकांसाठी तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याकडे जे काही आहे ते...”

आपल्या बेधडक विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. २००६ साली तिने ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. तिने आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रांमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. पण सध्या ती तिच्या अभिनयाने नाही तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. सोमवारी भाजप उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाली. यामध्ये कंगनाचे नाव समाविष्ट असलेले दिसून आले. या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का  बसला. याबाबत नुकताच कंगनाने आता याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (kangana ranaut on politics)

गेल्या काही दिवसांपासून तिच्या विधानसभेच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने २४ मार्चला १११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कंगनाचे नाव असून तिला लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. ती आता मंडीतून निवडणूक लढणार आहे. तिच्या राजकारण प्रवेशाबद्दल ती म्हणाली की, “देवाने माझ्यावर कृपा केली असून मला खूप आशिर्वाद दिले आहेत. माझ्यासाठी राजकारण हे पैसे कामावण्याचे माध्यम नसून लोकांची सेवा करण्याचा मार्ग आहे. लोककार्यकर्ता व अभिनेत्रीच्या रुपात आम्ही त्या ठिकाणी असतो जिथे समाजाच्यादेखील आमच्याकडून काही ना काही अपेक्षा असतात”.

आणखी वाचा – कंगना रणौत लवकरच लग्नबंधनात अडकणार?, जोरदार तयारी सुरु, लग्नाच्या ड्रेसही डिझाइन केला असल्याची चर्चा, कोण असणार जोडीदार?

#WATCH | Himachal Pradesh | BJP's candidate from Mandi for Lok Sabha elections and actor, Kangana Ranaut says, "I extend greetings to everyone on #Holi. This is my 'janmabhoomi' and it has called me back, I am fortunate…If they choose me, I will serve them. I am overwhelmed,… pic.twitter.com/rqdOTqi98C

— ANI (@ANI) March 25, 2024

पुढे ती म्हणाली की, “माझ्याकडे जे काही आहे ते सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे आणि भाजपमुळे आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन आणि लोकांनी मला जो आशिर्वाद केलं आहे त्यापेक्षा मी त्यांना अधिक देण्याचा प्रयत्न करेन. मी काका-पुतण्या या शब्दांचा वापर केला होता आणि मी हे सांगू इच्छिते की भाजप एक निष्पक्ष दृष्टिकोण असणारा आणि कार्यपद्धतीने काम करणारा पक्ष आहे”.

आणखी वाचा- घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात, जाहीरपणे दिली कबुली, म्हणाली, “डोळे बंद करुन…”

त्यानंतर ती म्हणाली की, “मी एक बॉलिवूड स्टार म्हणून नाही तर एका पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी राजकारणात प्रवेश केला आहे. पक्ष व समाजाच्या हितासाठी मी काम करेन. आज खूप लोक एकत्र आले आहेत ज्यांनी मला मार्गदर्शन केले आहे”.

दरम्यान कंगनाच्या राजकारणातील प्रवेशामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. आगामी काळामध्ये तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येणार असून त्यामध्ये तिने देशाच्या पहिल्या पंतप्राधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ऑपरेशन ‘ब्लु स्टार’ या मिशनवर अवलंबून असणार आहे.

Tags: bollywoodbollywood actresskangana ranautpolitics entry
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Spruha Joshi and Sagar Deshmukh’s new serial Sukh Kalale audience are excited

“या भूमिकांसाठी तुम्हीच योग्य”, स्पृहा जोशी व सागर देशमुखच्या ‘सुख कळले’ मालिकेच्या नवीन प्रोमोला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.