बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“या भूमिकांसाठी तुम्हीच योग्य”, स्पृहा जोशी व सागर देशमुखच्या ‘सुख कळले’ मालिकेच्या नवीन प्रोमोला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 26, 2024 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Spruha Joshi and Sagar Deshmukh’s new serial Sukh Kalale audience are excited

“या भूमिकांसाठी तुम्हीच योग्य”, स्पृहा जोशी व सागर देशमुखच्या ‘सुख कळले’ मालिकेच्या नवीन प्रोमोला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी अगदी जिव्हाळ्याचाच विषय. नवीन विषय व नवीन आशय असलेल्या मालिककांचे प्रेक्षकांना कायमच आकर्षण असते. त्यामुळे एखाद्या नवीन विषय व नवीन जोडी असलेली मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. अशातच आता छोट्या पडद्यावर काही नवीन मालिका सुरु होत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेता सागर देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेची घोषणा झाली.

‘सुख कळले’ असं या नव्या मालिकेचं नाव असून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा पासून या मालिकेविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अशातच आता या मालिकेचा आणखी एक नवीन प्रोमोदेखील प्रदर्शित झाला आहे. ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘सुख कळले’ या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये स्पृहा, सागरसह मालिकेतील इतर अनेक कलाकारही पाहायला मिळत आहेत. 

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : मेष ते मीन या राशींमध्ये आज कुणाचे नशीब अधिक चांगलं?, कोणाला मिळणार आर्थिक यश?, जाणून घ्या…

या नवीन प्रोमोखाली सुयश टिळक, सुकन्या मोने, शर्मिला शिंदे, प्रियदर्शन जाधव, समिरा गुजर आदी कलाकारांसह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक चाहत्यांनीही या नवीन प्रोमोखाली कमेंट्स करत मालिकेबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. या व्हिडीओखाली प्रेक्षकांनी “किती सुंदर प्रोमो आहे, खूपच छान, आम्ही उत्सुक आहोत, अगदी नवीन विषय आणि नवीन जोडी पाहायला मिळणार, खूप गोड आणि या भूमिकांसाठी स्पृहा व सागर हेच योग्य आहेत” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – “बाळ असेल तरंच…”, लग्नाच्या १३ वर्षांनंतरही बाळ न होण्याबाबत प्रिया बापटचं स्पष्टीकरण, म्हणाली, “मुलं नको आहेत आणि…”

दरम्यान, या प्रोमोद्वारे मालिकेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पण पण मालिकेची वेळ अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. अशातच कलर्स मराठीवर ‘इंद्रायणी’ नावाची आणखी एक एक नवीन मालिकादेखील नुकतीच सुरु झाली आहे. त्यामुळे आता स्पृहा व सागरची ही नवीन मालिका कोणत्या जुन्या मालिकेची जागा घेणार? कोणती जुनी मालिका संपून ही नवीन मालिका दाखवली जाणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  

Tags: marathi entertainment newsSagar Deshmukhspruha joshi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Priya Bapat Answers To Her Fan

"गुडन्यूज कधी देणार?", नाटकानंतर प्रेक्षकाने प्रिया बापटला विचारला प्रेग्नंसीचा प्रश्न, उत्तर देईपर्यंत थांबली, अभिनेत्री म्हणाली, "माझ्या आईनेही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.