आपल्या बेधडक विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. २००६ साली तिने ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. तिने आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रांमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. पण सध्या ती तिच्या अभिनयाने नाही तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. सोमवारी भाजप उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झाली. यामध्ये कंगनाचे नाव समाविष्ट असलेले दिसून आले. या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत नुकताच कंगनाने आता याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (kangana ranaut on politics)
गेल्या काही दिवसांपासून तिच्या विधानसभेच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने २४ मार्चला १११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कंगनाचे नाव असून तिला लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. ती आता मंडीतून निवडणूक लढणार आहे. तिच्या राजकारण प्रवेशाबद्दल ती म्हणाली की, “देवाने माझ्यावर कृपा केली असून मला खूप आशिर्वाद दिले आहेत. माझ्यासाठी राजकारण हे पैसे कामावण्याचे माध्यम नसून लोकांची सेवा करण्याचा मार्ग आहे. लोककार्यकर्ता व अभिनेत्रीच्या रुपात आम्ही त्या ठिकाणी असतो जिथे समाजाच्यादेखील आमच्याकडून काही ना काही अपेक्षा असतात”.
पुढे ती म्हणाली की, “माझ्याकडे जे काही आहे ते सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे आणि भाजपमुळे आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न करेन आणि लोकांनी मला जो आशिर्वाद केलं आहे त्यापेक्षा मी त्यांना अधिक देण्याचा प्रयत्न करेन. मी काका-पुतण्या या शब्दांचा वापर केला होता आणि मी हे सांगू इच्छिते की भाजप एक निष्पक्ष दृष्टिकोण असणारा आणि कार्यपद्धतीने काम करणारा पक्ष आहे”.
त्यानंतर ती म्हणाली की, “मी एक बॉलिवूड स्टार म्हणून नाही तर एका पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी राजकारणात प्रवेश केला आहे. पक्ष व समाजाच्या हितासाठी मी काम करेन. आज खूप लोक एकत्र आले आहेत ज्यांनी मला मार्गदर्शन केले आहे”.
दरम्यान कंगनाच्या राजकारणातील प्रवेशामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. आगामी काळामध्ये तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येणार असून त्यामध्ये तिने देशाच्या पहिल्या पंतप्राधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ऑपरेशन ‘ब्लु स्टार’ या मिशनवर अवलंबून असणार आहे.