गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जया बच्चन यांच्याशी सतत तुलना, कॅमेऱ्यासमोर भडकण्यावरुन काजोल म्हणाली, “बोलण्यात प्रवृत्त करता आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 24, 2025 | 12:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kajol talk about paparazzi

जया बच्चन यांच्याशी सतत तुलना, कॅमेऱ्यासमोर भडकण्यावरुन काजोल म्हणाली, “बोलण्यात प्रवृत्त करता आणि...”

पापाराझी हा नवा प्रकार गेल्या काही काळापासून बी-टाऊनमध्ये अधिक रुजू झाला. विविध ठिकाणी सेलिब्रिटींना स्पॉट करणं हे पापाराझींचं काम. मात्र बऱ्याचदा कलाकार त्यांच्या खासगी कामासाठी जातात, अंत्यसंस्कारासाठी जातात आणि तिथेही पापाराझी त्यांना घेरतात. हे काही कलाकारांना खटकतं. काजोललाही पापाराझींचं वागणं पटत नाही. बऱ्याचदा ती कॅमेऱ्यासमोर चिडलेलीच दिसते. अशावेळी काजोलची तुलना जया बच्चन यांच्याशी केली जाते. मात्र कॅमेऱ्यासमोर ती का चिडते? याचं खरं कारण आता समोर आलं आहे. काजोलनेच एका मुलाखतीदरम्यान याबाबत भाष्य केलं आहे. तसेच पापाराझींवरचा राग व्यक्त केला. (Kajol talk about paparazzi)

काजोलने झूमशी संवाद साधताना कॅमेऱ्यासमोर रागात का बोलते? याबाबत भाष्य केलं. काजोल म्हणाली, “मी तुम्हाला घाबरवते असं तुम्हाला वाटत असेल तर याने काहीच फरक पडत नाही. कृपया ‘माँ’ चित्रपट बघा. यामध्ये सगळं काही दाखवलं आहे. पापाराझी फोटोग्राफर्सविषयीही सांगितलं आहे. तुम्ही काय बोलता? याची फोटोग्राफर्स वाटच पाहत असतात. तुम्ही काहीतरी करण्यास, बोलण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून ते सतत तुम्हाला काही ना काही बोलतात. सतत ओरडू नका. ऐका शांत व्हा असं फोटोग्राफर्सना सांगण्याची वेळ येते. चांगले फोटो व व्हिडीओ शूट करण्यासाठी ओरडण्याची काही गरज नसते हे तुम्हालाही माहीत आहे”.

आणखी वाचा – “कोणाचं घर तोडायला प्रेम केलं नाही”, अरुणा इराणी यांचं लग्नाबाबत भाष्य, म्हणाल्या, “तुमचा नवरा…”

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

पुढे काजोल म्हणाली, “फक्त फोटो व व्हिडीओ शूट करण्यासाठीच पापाराझी नसतात. जर सेलिब्रिटी काही बोलले तर त्यांची एक टॅगलाइन तयार होते. नकारात्मक टॅगलाइनही त्यांना द्यायची असते. याबाबतच हे सगळं आहे”. काजोलने खरी परिस्थिती अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितली. मध्यंतरी बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अंतिम संस्कारालाही पापाराझी फोटोग्राफर्स येण्याबाबत काजोलने भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – आजारपणातही ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशाली करतोय शूट, १०२ ताप अन्…; स्वतःच सांगितली परिस्थिती

काजोल म्हणालेली, “पापाराझींबाबत माझे थोडे वेगळे विचार आहेत. मसा असं वाटतं की, काही जागा अशा आहेत की, जिथे त्यांनी येणं चुकीचं आहे. अंतिम संस्कारालाही कलाकारांच्या मागे मागे पळणंही मला चुकीचं वाटतं. एखाद्याचा अपमान केल्यासारखं मला हा प्रकार वाटतो. तुम्ही बाहेर जेवणासाठीही जाऊ शकत नाही हेच मला विचित्र वाटतं”. काजोलने अगदी स्पष्टपणे पापाराझींबाबत असलेली अडचण सांगितली.

Tags: bollywood newsentertainment newskajol
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Ankita Walawalkar Vaari Special

भजनात दंग, भक्तांना जेवण वाढलं आणि…; कोकणहार्टेड गर्ल पंढरपूरच्या यादीत नवऱ्यासह सहभागी, मनोभावे भक्ती अन् सेवा करताना…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.